सुषमाताई अंधारे आणि सौ. छायाताई शिंदे यांचा फलटण दौरा — डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा ठाम निर्धार!

 सुषमाताई अंधारे आणि सौ. छायाताई शिंदे यांचा फलटण दौरा — डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा ठाम निर्धार! 

✍️  जितेंद्र कारंडे, 

प्रतापगड प्रतिनिधी —

फलटण, दि. ३ नोव्हेंबर :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आणि उपनेत्या सौ. छायाताई शिंदे या सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी फलटण दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे कै. डॉ. संपदा मुंडे या भगिनीला न्याय मिळावा, या न्याययुद्धाला बळ देणे हा आहे.

सकाळी १० वाजता फलटण पोलीस स्टेशन येथे उपनेत्या सुषमाताई अंधारे आणि सौ. छायाताई शिंदे भेट देणार असून, त्या ठिकाणी त्या पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून न्यायप्रक्रियेबाबत पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. यशवंत घाडगे यांनी सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा आणि कोरेगाव मतदारसंघांतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी सांगितले की,

“कै. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा फक्त एका भगिनीचा नाही, तर संपूर्ण स्त्रीशक्तीचा आणि न्यायासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचा आहे. शिवसेना नेहमीच अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहिली आहे आणि आजही उभी राहील.”

या भेटीदरम्यान पक्षाच्या विविध आघाड्यांचे, सेल्सचे आणि विभागीय नेतृत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांची एकजूट आणि निर्धाराचे दर्शन घडेल.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या न्यायआंदोलनामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, महिला सक्षमीकरण आणि न्यायासाठीची भूमिका पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl