ई-केवायसीसाठी शासनाची मोठी दिलासा मुदतवाढ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत संधी
ई-केवायसीसाठी शासनाची मोठी दिलासा मुदतवाढ
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत संधी
✍️सातारा प्रतिनिधी –
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि आधार-आधारित प्रमाणीकरण (ई-केवायसी) करण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यांना दिलासा देत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.
या योजनेंतर्गत ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, पती वारलेले आहेत, अथवा घटस्फोट झालेले आहे, अशा पात्र लाभार्थींनी स्वतःचे ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तसेच पती किंवा वडील नसलेल्यांच्या बाबतीत संबंधित कागदपत्रे शासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया शासनाने स्पष्ट केली आहे.
आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत
पात्र लाभार्थींनी खालीलपैकी संबंधित कागदपत्रांची सत्यप्रत अंगणवाडी सेविकांकडे ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी जमा करणे आवश्यक आहे—
- पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र
- घटस्फोटाबाबत मा. न्यायालयाचा आदेश
तपासणी व शिफारस प्रक्रिया
अंगणवाडी सेविका त्यांच्या कडे जमा झालेल्या सर्व कागदपत्रांची समर्पक तपासणी करून त्या महिलांना पती/वडील ई-केवायसीमधून सूट देण्यास पात्र आहेत की नाही, याबाबत शिफारस करतील.
ही शिफारस पुढील प्रमाणे पाठवली जाईल—
- अंगणवाडी सेविका → CDPO (बाल विकास प्रकल्प अधिकारी)
- CDPO → जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
- जिल्हा अधिकारी → मा. आयुक्त, महिला व बाल विकास विभाग
- त्यानंतर शासनाकडे अंतिम शिफारस केली जाईल.
शासनाचे आवाहन
लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार करून संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावीत. तसेच ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही शासनाने केले आहे.
ही मुदतवाढ ग्रामीण व शहरी भागातील हजारो लाभार्थींना दिलासा देणारी ठरणार असून योजनेंतर्गत पात्र महिलांना लाभ मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.
Comments
Post a Comment