महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद निवडणूक 2025मतदान अधिकाऱ्यांसाठी सविस्तर प्रशिक्षण कार्यशाळा पार

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद निवडणूक 2025
मतदान अधिकाऱ्यांसाठी सविस्तर प्रशिक्षण कार्यशाळा पार

✍️मिलिंद काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर – महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता खादी ग्रामोद्योग सभागृह, महाबळेश्वर येथे संपन्न झाले.

प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्रावरील प्रत्येक टप्प्याची – मतदान सुरू होण्यापूर्वीची तयारी, मतदान यंत्रणा तपासणी, प्रत्यक्ष मतदानाची कार्यपद्धती, आवर्जून पाळावयाच्या निवडणूक आचारसंहितेची माहिती तसेच मतदान प्रक्रिया संपल्यानंतरच्या सीलिंग व सुपूर्दगीची— सविस्तर माहिती देण्यात आली.
विशेषतः EVM आणि VVPAT यंत्रणेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, त्यातील तांत्रिक बाबी, काळजी घेण्याच्या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चिन्हांकित मतदार यादी (Marked Electoral Roll) हाताळण्याची पद्धत, तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी घ्यायची खबरदारी यावरही स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सादरीकरण मा. निवडणूक निर्णय अधिकारी, महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद श्री. सचिन मस्के यांनी समर्पक उदाहरणांसह केले. मतदान प्रक्रियेत अनुशासन, संवेदनशील केंद्रांवरील विशेष दक्षता, तसेच पोलीस प्रशासनाशी समन्वय यांसारख्या मुद्द्यांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक तथा कार्यकारी प्रशासन, शेती महामंडळ पुणे श्रीमती पल्लवी निर्मळ यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील नितळ आणि त्रुटीरहित अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले.

या प्रशिक्षण सत्रात

  • सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. योगेश पाटील,
  • गट विकास अधिकारी श्री. विजय विभूते,
  • सहायक निबंधक श्रीमती अनुराधा पंडितराव

यांनीही विविध प्रशासकीय व तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला नियुक्त सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीदरम्यान कोणतीही चूक किंवा गोंधळ होऊ नये, तसेच पारदर्शक आणि शांततापूर्ण मतदान पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl