टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरमध्ये भव्य रक्तदान शिबिर — 200 हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरमध्ये भव्य रक्तदान शिबिर — 200 हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग 

✍️  राजेश सोंडकर , 

महाबळेश्वर प्रतिनिधी –

“रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या विचाराचा अवलंब करत टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वर येथे एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला तरुण वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल 200 हून अधिक स्वयंसेवकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी निभावली.

या शिबिराचे आयोजन टायगर ग्रुपचे महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष श्री. कुणाल भाऊ राऊत यांनी केले होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “आजच्या काळात रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा अपघातग्रस्त वा गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्याने मृत्यू ओढवतो. त्यामुळे प्रत्येक तरुणाने दरवर्षी किमान एकदा तरी रक्तदान करण्याचा संकल्प करावा.”

शिबिरात सहभागी झालेल्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश यशस्वी ठरला. सामाजिक हिताचे काम हेच खरे सेलिब्रेशन असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला.

या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण सहकार्य करणाऱ्यांमध्ये सलमान भाई पटेल, ऋषी डोईफोडे, किशोर शिंगरे, आशुतोष मोहिते, सनी जाधव, अनुज कुरुंदे, सौरभ चिकणे, अंकित यादव, तेजस बकरे, प्रणय ढेबे, सौरभ साठे, शुभम फळणे, ओमकार पारखी, सार्थक ढेबे, प्रतीक राऊत, प्रथमेश गुजर, ओंकार जाधव, संकेत शिंगरे, सागर चिकने, कार्तिक हिरवे, अतिफ सय्यद, कुणाल कदम, ओंकार चिकणे, अकिलेश ढेबे यांचा समावेश होता.

रक्तदान शिबिराची संपूर्ण व्यवस्था टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे सांभाळली. रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्त संकलनाचे काम सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने पार पाडले.

कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व रक्तदात्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या या उपक्रमामुळे टायगर ग्रुपची सामाजिक भुमिका अधोरेखित झाली आहे.

🔸 “रक्तदान केल्याने दुसऱ्याचे जीवन वाचते आणि आपल्या अंतःकरणात नवी ऊर्जा निर्माण होते. हीच खरी मानवतेची पूजा आहे,” असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

महाबळेश्वर शहरात सामाजिक कार्याचा नवा अध्याय या रक्तदान शिबिरातून रचला गेला असून, आगामी काळात अशाच अनेक उपक्रमांद्वारे जनसेवा करण्याचा निर्धार टायगर ग्रुपने व्यक्त केला.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl