महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२५नगराध्यक्षपदासाठी 'कुमार भाऊ शिंदे' यांना शिवसेनेकडून एकमताने उमेदवारी
महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२५
नगराध्यक्षपदासाठी 'कुमार भाऊ शिंदे' यांना शिवसेनेकडून एकमताने उमेदवारी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्धार
महाबळेश्वर (प्रतिनिधी) –
आगामी महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महत्त्वाचा राजकीय डाव खेळत नगराध्यक्षपदासाठी आपल्या उमेदवारीचा फॉर्म्युला स्पष्ट केला आहे. महाबळेश्वर शहर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक सातारा उपजिल्हाप्रमुख संजय शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी कुमार भाऊ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शहरप्रमुख विजय भाऊ नायडू यांनी केले. शहरातील संघटनात्मक बांधणी, येणाऱ्या निवडणुकीतील रणनीती व उमेदवारांच्या निवडीवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती विभाग प्रमुख हेमंत साळवी आणि शहर संघटक सुनील ढेबे यांच्या अनुमोदनानंतर कुमार भाऊ शिंदे यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
“शिंदे-सरकारच्या विकासधोरणाला शहरात न्याय देणार” – कुमार भाऊ शिंदे
उमेदवारी घोषणेनंतर मनोगत व्यक्त करताना कुमार भाऊ शिंदे म्हणाले –
“शहराच्या विकासासाठी शिवसैनिकांच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही मैदानात उतरत आहोत. सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊनच या लढतीला न्याय देऊ. महाबळेश्वर नगरपरिषदेत प्रामाणिक प्रशासन आणि विकासाचा नवा अध्याय सुरू करणार आहोत.”
“एकजूट ठेवा, विजय निश्चित” – उपजिल्हाप्रमुख संजय शेलार
अध्यक्षीय भाषणात संजय शेलार यांनी सांगितले –
“शिवसेना नेहमी संघटनेच्या बळावर निवडणुका लढली आहे. या वेळी देखील आपण एकजूट ठेवून प्रामाणिक प्रचार करायचा आहे. प्रत्येक विभागात समन्वय, शिस्त, आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग हीच आपल्या विजयाची गुरुकिल्ली असेल.”
तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत – “महाबळेश्वर विकासासाठी सरकारची साथ आणि निधी दोन्ही मिळवू,” असा विश्वास व्यक्त केला.
कार्यकर्त्यांचा जोश वाढवणारी उपस्थिती
बैठकीस शिवसेना शहर संघटनेतील प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवक शाखा, उपतालुका पदाधिकारी, विभाग प्रमुख तसेच ज्येष्ठ शिवसैनिक उत्साहात उपस्थित होते. त्यात प्रमुख उपस्थिती –
सतीश ओंबळे, सचिन गुजर, सचिन जेधे, हेमंत साळवी, उस्मान खारखंडे, वर्षाताई आरडे, मेघा चोरगे, सुनिता ताई फळणे, आशाताई जाधव, सोनाली बांदल, मंगल ताई फळणे, प्रभा नायडू, अपूर्वा डोईफोडे, पूजा उतेकर, तुषार उतेकर, संदीप आखाङे, राहुल साळुंखे, सुमित कांबळे, किरण मोरे आदी मान्यवरांची होती.
उमेदवार निवड प्रक्रियेसाठी समन्वय समिती
निवडणुकीच्या तयारीस अधिक गती देण्यासाठी समन्वय समिती नेमण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी आपले अर्ज शहरप्रमुख विजय भाऊ नायडू यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले. बैठकीच्या शेवटी आभार प्रदर्शन सोनाली बांदल यांनी केले.
ही बैठक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली असून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी स्पष्ट केल्याने आगामी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Comments
Post a Comment