महाबळेश्वर : रोटरी क्लबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ वितरण सोहळा
महाबळेश्वर : रोटरी क्लबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ वितरण सोहळा
ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनल, महाबळेश्वर यांनी आयोजित “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५” सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा शिक्षण क्षेत्रातील कार्यरत शिक्षकांच्या समर्पित सेवेला मान्यता देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
सोहळ्यात विविध शाळांतील शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण खालील शिक्षकांना करण्यात आले:
- संजय सोंडकर – जि.प.शाळा, कुंभरोशी
- संतोष चोरगे – जि.प.शाळा, माचुतर
- निलेश होमकर – चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय, मेटगुताड
- संदीप जाधव – वागावळे हायस्कूल
- यशवंत गोळे – न.प.शाळा क्र.१, मश्वर
- तस्नीम वारुणकर – न.प.शाळा क्र.३, मश्वर
- गितांजली भोसले – माखारिया हायस्कूल
सोहळ्यात रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे, सचिव महेश कोमटी, तसेच सर्व रोटरी मेंबर्स उपस्थित होते. पुरस्कार वितरणादरम्यान अध्यक्ष विजय काळे यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या या शिक्षकांचा गौरव करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, हेच आमच्यासाठी फार मोलाचे आणि आनंददायी आहे.”
या सोहळ्याद्वारे शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याला अधिक बळकटी मिळवून देण्याचा उद्देश होता. रोटरी क्लबच्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासही मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, ज्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, आणि रोटरी सदस्य यांचे अभिवादन आणि प्रेरणादायी संवाद यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
Comments
Post a Comment