वाई पंचायत समिती मतदारसंघात यशवंतनगर गणातून स्वप्निल गायकवाड यांची उमेदवारीची जोरदार चर्चा

वाई पंचायत समिती मतदारसंघात यशवंतनगर गणातून स्वप्निल गायकवाड यांची उमेदवारीची जोरदार चर्चा

 जितेंद्र करंडे, 
प्रतापगड प्रतिनिधी –

वाई | येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून वाई पंचायत समिती मतदारसंघातील यशवंतनगर गणातून युवा नेतृत्व म्हणून स्वप्निल गायकवाड यांच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली आहे. सर्वसामान्य जनतेशी घट्ट नाळ जुळवून कार्य करणारे, स्थानिकांच्या समस्या समजून त्यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणारे म्हणून गायकवाड यांचे नाव ग्रामविकासाच्या राजकारणात ठळकपणे पुढे येत आहे.

स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांमध्ये सातत्याने सहभाग घेतल्याने स्वप्निल गायकवाड यांनी स्वतःची ओळख कार्यकर्ते-नेते नव्हे तर लोकसेवक म्हणून निर्माण केली आहे. परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या, आरोग्य सुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांसाठी रोजगार यांसारख्या मुद्यांवर त्यांनी आवाज उठवत प्रत्यक्ष उपाययोजना राबविल्या आहेत.

गायकवाड यांच्या पाठिशी अशोक गायकवाड आणि रामदासजी आठवले यांसारख्या प्रभावी नेतृत्वाचा खंबीर पाठिंबा असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. गणातील तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गामध्ये त्यांच्याबाबत सकारात्मकता आणि आपुलकी दिसून येत आहे.

स्वप्निल गायकवाड यांच्या नावाची चर्चा वाढत असताना, स्थानिक जाणकारांचे म्हणणे आहे की, "गेल्या काही वर्षांत यशवंतनगर गणामध्ये ठोस विकासाची गरज आहे. त्यासाठी दमदार इच्छाशक्ती असलेले नेतृत्व हवे. स्वप्निल गायकवाड यांनी केलेले सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि कार्यपद्धती लक्षात घेता, जनता त्यांनाच उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे."

याबाबत स्वप्निल गायकवाड यांनी प्रतिक्रियेत सांगितले की,
"माझ्याकडे कोणताही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेचा अजेंडा नाही. जनतेच्या विश्वासावर चालणारे सामाजिक कार्य हेच माझे बळ आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांचा पाठिंबा असल्यास जबाबदारी स्विकारण्यास मी तयार आहे."

दरम्यान, यशवंतनगर गणात आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गायकवाड यांच्या इच्छुकतेमुळे या गणातील निवडणुकीची लढत रंगतदार होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl