महाबळेश्वर शिवसेनेची मतदार यादीतील त्रुटींवर लेखी हरकत; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर


महाबळेश्वर शिवसेनेची मतदार यादीतील त्रुटींवर लेखी हरकत; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

जितेंद्र कारंडे,

महाबळेश्वर प्रतिनिधी | 

महाबळेश्वर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहरप्रमुख विजय (भाऊ) दत्तात्रय नायडू यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी (मतदार यादी) यांना लेखी निवेदन देत अधिकृत हरकत नोंदविण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाच्या 30 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असली तरी एकाच मतदाराचे नाव दुबार प्रभागात, अनेक पात्र मतदारांची नावे वगळली जाणे, पत्त्यात चुका, मृत व्यक्तींची नावे यादीत कायम असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

विजय नायडू यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की –

“महाबळेश्वर नगरपरिषदेतील एकूण 17 प्रभागांपैकी विशेषतः प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधील मतदार यादीत अत्यंत गंभीर चुका आढळल्या आहेत. अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकण्यात आली असून प्रभाग रचनेतील निकषांचा भंग झाल्याचे स्पष्ट दिसते. मतदार यादीतील या गोंधळामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम व रोष निर्माण झाला आहे. मतदार यादीची तात्काळ तपासणी करून दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देतो.”

शिवसेनेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनावर संबंधित कार्यालयातील कनिष्ठ लिपिक यांनी दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी स्वीकृती दर्शवली आहे. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार यादी दुरुस्तीची योग्य संधी नागरिकांना मिळावी, अन्यायाने मताधिकार हिरावला जाऊ नये यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदार यादीतील अचूकता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली असून येणाऱ्या काही दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.


निवेदनातील प्रमुख मागण्या :

  • प्रभागनिहाय मतदार यादीची पुन्हा सखोल तपासणी करावी
  • दुबार नावे, चुकीची नावे व अयोग्य नावे त्वरित हटवावीत
  • पात्र मतदारांची वगळलेली नावे यादीत समाविष्ट करावीत
  • प्रत्येक प्रभागाची सुधारित यादी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करावी

या घडामोडींमुळे महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीची रंगत वाढली असून आगामी राजकारणात ही बाब महत्वाची ठरणार आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl