महाबळेश्वर तालुक्यातील वनकामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या आदेशानंतर वन विभागाचा निर्णय

महाबळेश्वर तालुक्यातील वनकामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या आदेशानंतर वन विभागाचा निर्णय


जितेंद्र कारंडे,

प्रतापगड प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत कार्यरत कामगारांच्या दीर्घकालीन वेतनवाढीच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर यांच्या पुढाकाराने आणि भाजप कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सनी मोरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

दिनांक ४ जून २०२५ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मा. कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांच्यासोबत सनी मोरे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील वनकामगारांच्या वेतनवाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री महोदयांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत सहायक कामगार आयुक्त, सातारा यांना तातडीने लेखी आदेश पाठवून संबंधित कामगारांना न्याय देण्याचे निर्देश दिले होते.

यानंतर सातारा येथील कार्यालयात संयुक्त वन व्यवस्थापन समिती महाबळेश्वर विभाग, प्रशासन आणि सनी मोरे यांच्यात सुनावणी घेण्यात आली. सविस्तर चर्चेनंतर प्रशासनाने कामगारांची मागणी ग्राह्य धरत सर्व कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय जाहीर केला.

या निर्णयानंतर सनी मोरे यांनी समाधान व्यक्त करत वन विभागाचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “महाबळेश्वर तालुक्यातील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही सातत्याने लढा देत आलो आहोत. कामगारांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावावे, हीच आमची भूमिका आहे. वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत कामगारांना न्याय दिला आहे.”

तसेच, सनी मोरे यांनी भाजप कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने आश्वासन दिले की भविष्यातही कामगारांच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करण्यात येईल. “कामगारांसाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. त्यांचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू राहतील,” असेही त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे महाबळेश्वर तालुक्यातील अनेक कामगारांना दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले आहे.

–✍️ जितेंद्र कारंडे, प्रतापगड प्रतिनिधी

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl