मेटगुताड येथे किल्ले स्पर्धा उत्साहात; गोपाळ कृष्ण मंडळाला प्रथम क्रमांक
मेटगुताड येथे किल्ले स्पर्धा उत्साहात; गोपाळ कृष्ण मंडळाला प्रथम क्रमांक
प्रेषित गांधी,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड गावामध्ये विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर जय हनुमान मंडळाच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागात इतिहास आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेला स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत गोपाळ कृष्ण मंडळाने अव्वल क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला रुपयांचे ३,००१/- चे पारितोषिक संतोष सखाराम बावळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक हनुमान मंडळ, मेटगुताड यांना प्राप्त झाला असून त्यांना २,००१/- रुपये संजय रामचंद्र बावळेकर यांच्या वतीने देण्यात आले. तृतीय क्रमांक ओजस बावळेकर व सहकारी यांनी पटकावला असून त्यांना १,००१/- रुपयांचे पारितोषिक श्रीकांत चंद्रकांत बावळेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
तर चतुर्थ क्रमांक आयुष उमेश बावळेकर यांना मिळाला असून ५०१/- रुपये परितोषिक महेश सुरेश बावळेकर यांच्या सौजन्याने प्रदान करण्यात आले. तसेच सुयश बावळेकर व श्रीराज बावळेकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
विजेत्यांना चषक आणि पारितोषिके टॅक्सी संघटनेचे माजी अध्यक्ष ह.भ.प. अंकुश नाना बावळेकर, गणेश लक्ष्मण बावळेकर, राजेंद्र आप्पा बावळेकर, उमेश बावळेकर (पाटील), धनंजय बावळेकर, ऋषिकेश बावळेकर, बाबू ओंबळे, सुमित गोळे आणि सनी बावळेकर यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत शिवराम बावळेकर यांनी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
तर स्पर्धा समितीचे अध्यक्ष दिनेश लक्ष्मण बावळेकर, उपाध्यक्ष संकल्प संतोष बावळेकर आणि सचिव महेश सुरेश बावळेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
गावातील सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने कार्यक्रमाला उपस्थित राहून आयोजन समितीचे अभिनंदन केले. किल्ले बांधणीच्या माध्यमातून इतिहासाची जपणूक व सांस्कृतिक परंपरा वृद्धिंगत करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
Comments
Post a Comment