गांजवणे येथे बळीराजा शेतकरी गटाचे नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न
गांजवणे येथे बळीराजा शेतकरी गटाचे नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न
प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी :
मौजे गांजवणे, तालुका पोलादपूर, रायगड येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत बळीराजा शेतकरी गटाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषि अधिकारी श्रीमती वैशाली फडतरे, मंडळ कृषि अधिकारी सुनील धनवट, मंडळ कृषि अधिकारी शिंदे, उप कृषी अधिकारी मोरे, पोलिस पाटील राजेंद्र झाडाने आणि बळीराजा गटाचे अध्यक्ष हरिश्चंद्र कदम उपस्थित होते. प्रशिक्षणात शेतकऱ्यांना बायो-इनपुट रिसॉर्स सेंटर (बी. आर. सी. युनिट) चा योग्य वापर, जैविक निविष्ठांचा लाभ आणि त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले गेले.
श्रीमती फडतरे यांनी विशेषतः जीवामृत तयार करण्याची प्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे दाखवली, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नैसर्गिक खतनिर्मिती समजून घेता आली. प्रशिक्षणात गटाचे एकूण 23 सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी शेतकऱ्यांना स्वनिधी भरून आपल्या शेतांमध्ये नैसर्गिक शेतीचे नियोजन करून जास्तीत जास्त क्षेत्र नैसर्गिक शेती अंतर्गत आणण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना फक्त उत्पादन वाढवण्याबाबत नव्हे तर पर्यावरणपूरक शेती करण्याचेही प्रोत्साहन मिळाले.
बळीराजा शेतकरी गटाच्या प्रशिक्षणामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता वाढेल आणि आगामी हंगामात अधिक शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक शेतीचा लाभ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment