महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२४ : आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२४ : आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

विलास काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी:

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सन २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नगरपरिषद प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी प्रभागनिहाय आरक्षित जागा ठरविण्यासाठी गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता खादी व ग्रामोद्योग सभागृह, महाबळेश्वर येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

या सोडतीनंतर आरक्षणाचे तपशील ९ ऑक्टोबर २०२५ रोजी महाबळेश्वर नगरपरिषदेत प्रसिद्ध केले जाणार आहेत. यानंतर नागरिकांना या आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्यासाठी ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ अशी मुदत देण्यात आली आहे. इच्छुकांनी आपली हरकत लेखी स्वरूपात, सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासक तथा मुख्याधिकारी, महाबळेश्वर नगरपरिषद कार्यालयात सादर करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नगरपरिषद प्रशासनाने पुढे सांगितले की, आरक्षण सोडतीची प्रक्रिया ही पारदर्शक व लोकसहभागावर आधारित असावी, यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष सोडतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीतील हा एक निर्णायक टप्पा मानला जात असून, आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची चाचपणी, राजकीय समीकरणे आणि प्रचाराच्या हालचालींनाही सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl