महाबळेश्वरमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची लगबग – राजकारण तापले, चर्चा आणि अंदाज वर्तवण्यात नागरिक सहभागी

महाबळेश्वरमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची लगबग – राजकारण तापले, समीकरणे गुंतागुंतीची
चर्चा, अंदाज वर्तवण्यात नागरिक सहभागी 

जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी –

थंडीच्या मोसमासह सध्या महाबळेश्वर शहरातील राजकारण चांगलेच तापले असून, नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची लगबग वाढली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असल्याने शहरात राजकीय चैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी नगराध्यक्ष पदाला सर्वसाधारण आरक्षण लागू झाल्याने विविध गटातील दिग्गजांसह तरुण नेतृत्वालाही संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मागील पाच वर्ष न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता निवडणूक जाहीर झाल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असून, प्रत्येक मतदाराला थेट नगराध्यक्षपदासाठी एक मत आणि प्रभागातील दोन सदस्यांसाठी दोन मते देण्याचा अधिकार असणार आहे. महाबळेश्वरची निवडणूक राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या आणि अर्थकारणाच्या दृष्टीने प्रभावी निवडणुकांपैकी एक मानली जाते.


---

राजकीय समीकरणे गुंतागुंतीची

या निवडणुकीत महायुतीच्या आघाडीत मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरणार असल्याची  चर्चा आहे. 

 दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट)  सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.  शहरप्रमुख विजय नायडू यांची भूमिकाही निर्णायक राहणार आहे.

भारतीय जनता पक्ष देखील या निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावताना दिसल. मात्र भाजपची ताकद मंत्री मकरंद पाटील पुरस्कृत गटाला मिळणार की शंभूराज देसाई यांच्यागटाला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप शहराध्यक्ष रवींद्र कुंभारदरे यांची रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.


---

महाविकास आघाडीमध्ये उत्सुकता

महाविकास आघाडीतशिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काॅंग्रेस एकत्र येण्याची शक्यता असली तरी स्थानिक पातळीवरील मतभेद मोठे आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांकडून स्वतंत्र उमेदवारीची तयारी सुरू असून, त्यांना शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांचा पाठिंबा लाभणार की ते वेगळी आघाडी तयार करणार, याबाबत चर्चा जोरात आहेत.
---
उमेदवारांची आघाडी

गट / आघाडी चर्चेत असलेली नावे

रा.काँ. (अजित पवार गट) सुनील शिंदे, नासिर मुलाणी, विशाल तोष्णीवाल, अफजल सुतार, रोहित ढेबे, विमलताई पार्टे,किसनशेठ शिंदे 
महाविकास आघाडी (शरद पवार गट – ठाकरे गट) राजेंद्र कुंभारदरे, डी. एम. बावळेकर,
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कुमार शिंदे, विजय नायडू, हेमंत साळवी (नाव चर्चेत)

नाराज इच्छुक उमेदवारांना युतीतून उमेदवारी नाही मिळाली तर महाविकास आघाडीकडून त्यांना संधी देण्यात येऊ शकते.

---

महाबळेश्वरची नगरपालिका निवडणूक म्हणजे स्थानिक विकास, पर्यटन वाढ प्रभाव आणि आर्थिक शक्ती यांचा मेळ मानली जाते. त्यामुळे येथील निवडणूक केवळ पक्षनिष्ठेवर नव्हे तर गटांची एकजूट, नेतृत्वावरचा विश्वास आणि स्थानिक स्तरावरील संबंधांवर ठरणार आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारांच्या भेटीगाठी, शक्तीप्रदर्शन, आघाड्यांच्या चर्चांना वेग येणार हे निश्चित. शहरातली ही पुढील राजकीय शर्यत नेमकी कोणाच्या दिशेने वळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl