महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षातील भव्य पथसंचलन

महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षातील भव्य पथसंचलन

विलास काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी :

 विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) तर्फे शताब्दी वर्षाचा भव्य पथसंचलन सोहळा रविवारी (दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी) आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्यासाठी आणि राष्ट्रकार्याला आपला सहभाग नोंदवण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त होणारा हा सोहळा महाबळेश्वर तालुक्यातील स्वयंसेवकांसाठी अभिमानाचा ठरेल. हॉटेल ड्रीमलँड, महाबळेश्वर येथे सकाळी १०.३० वाजता या पथसंचलनाची सुरुवात होणार असून, शेकडो स्वयंसेवक पारंपरिक गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव हा दरवर्षी शौर्य, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हा उत्सव विशेष ठरणार असून, "काळ बदलला, ध्येय तेच राष्ट्रप्रथम" या घोषवाक्यासह समाजात एकात्मता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच सर्व स्तरातील समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांनी सांगितले की, "आपण सर्वांनी या भव्य पथसंचलनात सहभगी होऊन राष्ट्रकार्यासाठी योगदान द्यावे, ही नम्र विनंती आहे."

संपर्कासाठी आयोजकांनी विशेष क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत:
📞 ९४०३९५०९६५ / ९८९०६५०९६५ / ९४२०४९६७८२


👉 हा सोहळा महाबळेश्वर तालुक्यातील संघाच्या कार्याची ताकद आणि राष्ट्रीय भावनेचा जागर संदेश देणारा ठरणार आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl