खेड तालुक्यातील पोलिस पाटीलांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चावयमर्यादा ६५ वर्षांवर लवकरच निर्णय – सकारात्मक हमी


खेड तालुक्यातील पोलिस पाटीलांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा
वयमर्यादा ६५ वर्षांवर लवकरच निर्णय – सकारात्मक हमी

रवी चव्हाण,

मेढा  प्रतिनिधी – 

खेड तालुक्यासह राज्यातील पोलिस पाटीलांच्या प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढण्याच्या दिशेने महत्वाची बैठक आज चाकण येथे पार पडली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांची खेड तालुक्याचे भाग्यविधाता, कार्यसम्राट आमदार मा. श्री. बाबाजीशेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधी मंडळाने भेट घेतली. या भेटीत पोलिस पाटीलांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

बैठकीदरम्यान पोलिस पाटीलांच्या वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच निर्णय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच इतर न्याय्य मागण्यांवरही सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत रु. १,५१,००० ची आर्थिक मदत मुख्यमंत्री साहेबांना सुपूर्द करण्यात आली. ही मदत मा. श्री. बाळासाहेब शिंदे पाटील (अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघ) यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये –

  • श्री. साहेबराव राळे पाटील – अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र पोलिस पाटील संघ
  • सौ. तृप्तीताई मांडेकर पाटील – अध्यक्षा, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी पोलिस पाटील संघ
  • श्री. दिपक पावडे पाटील – अध्यक्ष, खेड तालुका पोलिस पाटील संघ
  • श्री. अमोल पाचपुते पाटील – मा. अध्यक्ष, खेड तालुका पोलिस पाटील संघ
  • श्री. बळीराम गायकवाड पाटील
  • श्री. नवनाथ काळोखे पाटील
    आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस पाटीलांच्या मागण्यांवरील ही बैठक अत्यंत फलदायी व सकारात्मक ठरल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. राज्यातील ग्रामस्तरावरील कायदा-सुव्यवस्थेची भक्कम कडी असलेल्या पोलिस पाटीलांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl