महाबळेश्वर नगरपालिकेची तयारी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची रणनीती बैठक

महाबळेश्वर नगरपालिकेची तयारी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची रणनीती बैठक

जितेंद्र कारंडे,

प्रतापगड प्रतिनिधी –

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब दरे गावात वसुबारस निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुक्कामी आले असता महाबळेश्वर शिवसेना शहर संघटनेतर्फे नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या भेटीत नगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबतचे निवेदन शिंदे साहेबांना सादर करण्यात आले.

महाबळेश्वर शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना, मतदार यादीतील दुरुस्त्या, स्थानिक विकासाचे प्रलंबित प्रश्न आणि संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिंदे साहेबांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महाबळेश्वर नगरपालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे. विकासाचा अजेंडा घेऊन स्थानिक जनतेचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे. मतदारयाद्या प्रभागनिहाय नीट तपासा आणि संघटनात्मक तयारी मजबूत करा,” असे निर्देश त्यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना दिले.


शंभूराज देसाई ठेवणार निवडणुकीवर लक्ष

या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आ. शंभूराज देसाई हे महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकांवर विशेष लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते जबाबदारीने आणि तळागाळातील मतदारांशी संपर्क वाढवून पक्षाची ताकद प्रभागनिहाय वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.


विकास विषयक चर्चेस प्राधान्य

बैठकीत महाबळेश्वर शहरातील अनेक नागरी प्रश्नांवर शिंदे साहेबांशी चर्चा झाली. विशेषतः

  • पाणीपुरवठा व्यवस्थेचा वाढता ताण
  • पर्यटन नियोजन आणि वाहतूक कोंडी
  • रस्ते व गटार व्यवस्था
  • विकासकामांसाठी निधी उपलब्धता
    याबाबत शहराच्या वतीने आढावा मांडण्यात आला.

वसुबारस निमित्त साधली भेट

शिंदे साहेब वसुबारस निमित्त दरे येथील स्वतःच्या गोठ्यात गाईंचे पूजन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांचा महाबळेश्वर शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्नेहपूर्ण सत्कार केला. या निमित्ताने स्थानिक पातळीवर थेट संवाद घडून आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


या वेळी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,
“आज आम्हाला साहेबांचा अमूल्य वेळ मिळाला. महाबळेश्वरच्या विकासासाठी आणि मजबूत संघटनेसाठी यापुढे जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे,” असे भावना व्यक्त करण्यात आल्या.


कार्यक्रमास महाबळेश्वर शहरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 ✍️📰

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl