महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शुद्धीपत्रक जाहीर – केंद्रप्रमुख भरती पात्रतेत दुरुस्ती“समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख)” मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ संदर्भातील महत्त्वाची घोषणा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शुद्धीपत्रक जाहीर – केंद्रप्रमुख भरती पात्रतेत दुरुस्ती
“समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख)” मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ संदर्भातील महत्त्वाची घोषणा
सातारा प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५” संदर्भात महत्त्वाचे शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदोन्नतीचा मार्ग खुला करणारी ही परीक्षा १ डिसेंबर २०२५ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.
पात्रता नियमात महत्त्वाची दुरुस्ती
यापूर्वी २९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार पात्रता अटीतील मुद्दा क्रमांक ४.२ आणि ४.३ मध्ये नमूद केलेल्या मजकुरात तांत्रिक त्रुटी असल्याने राज्य परीक्षा परिषदेने शुद्धीपत्रकाद्वारे दुरुस्ती केली आहे.
मूळ मजकूर (पूर्वी प्रसिद्ध):
- उमेदवाराकडे बी.ए./बी.कॉम./बी.एस.सी. पदवी असणे बंधनकारक
- किमान ६ वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून अखंडीत सेवा
- शिक्षण सेवक म्हणून केलेली सेवा ग्राह्य
दुरुस्तीनंतरचा बदललेला मजकूर (अंतिम वाचावा असा):
४.२ – जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./बी.एस.सी. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
४.३ – शासन निर्णय दिनांक २९/०८/२०२५ नुसार मुद्दा क्र. ३ मधील ब) ii) अन्वये ०१/०१/२०२५ रोजीच्या अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेतला जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) म्हणून किमान सहा वर्षांची अखंडीत सेवा आवश्यक असून शिक्षण सेवक म्हणून केलेली सेवा ग्राह्य धरली जाईल.
राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाचे परिपत्रक
या शुद्धीपत्रकामुळे जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया अधिक स्पष्ट व पारदर्शक झाली आहे. अनेक शिक्षकांनी याबाबत पूर्वी उपस्थित केलेल्या शंका आणि पात्रता संदर्भातील भ्रम दूर करण्यासाठी हे दुरुस्तीपत्रक उपयुक्त ठरणार आहे.
शिक्षकांसाठी सूचना
- परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आणि इतर तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून तपासता येणार आहेत.
- पात्रता बदलामुळे अधिक शिक्षक परीक्षेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे.
- ज्यांनी आधी पात्रता अटींच्या गोंधळामुळे अर्ज प्रक्रियेबाबत संभ्रम व्यक्त केला होता, त्यांनी नवीन शुद्धीपत्रकानुसार अर्ज पुढे चालू ठेवावा.
ही दुरुस्ती परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली असून राज्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या करिअर प्रगतीसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
— "माझं गाव माझी बातमी" ✍️
Comments
Post a Comment