महाबळेश्वर तालुक्यात आज आरक्षण सोडतजिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदांच्या आरक्षणाकडे तालुक्याचे लक्ष
महाबळेश्वर तालुक्यात आज आरक्षण सोडत
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदांच्या आरक्षणाकडे तालुक्याचे लक्ष
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदांची आरक्षण सोडत आज महाबळेश्वर येथील ‘मध संचालनालय सभागृहात’ पार पडणार असून, या सोडतीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकूण सहा प्रतिनिधी तालुक्यातून निवडले जाणार आहेत. त्यात जिल्हा परिषदेसाठी दोन गट तर पंचायत समितीसाठी चार गणांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद सदस्यपदासाठी गट
- भिलार गट
- तळदेव गट
पंचायत समिती महाबळेश्वर सदस्यपदासाठी चार गण
- भिलार
- मेडगुताड
- कुंभारशी
- तळदेव
ओबीसी आरक्षण कोणत्या गणात? उत्सुकता शिगेला
यापूर्वीच महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती पदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे आता पंचायत समिती सदस्यपदातील ओबीसी आरक्षण कोणत्या गणात पडते, याकडे कार्यकर्ते आणि नागरिकांचे विशेष लक्ष लागून आहे.
राजकीय चर्चेनुसार, ज्या गणात ओबीसी आरक्षण निश्चित होईल, त्या गणातूनच पंचायत समितीचा आगामी सभापती निवडला जाणार, असे संकेत मिळत असून त्यामुळे स्थानिक पातळीवर सूक्ष्म मांडणी, समीकरणे आणि चर्चांना जोर आला आहे.
अनुसूचित जातीचा प्रश्न कायम?
या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षण मिळणार का याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यातील अनुसूचित जातीच्या नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
- पंचायत समिती सदस्यपदी
- जिल्हा परिषद सदस्यपदी
या दोन्ही ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आरक्षण मिळण्याची अपेक्षा होती. तथापि, आज होत असलेल्या सोडतीत SC आरक्षण मिळणार नसल्याच्या चर्चा तालुक्यात सुरू आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर नाराजीही व्यक्त केली आहे.
राजकीय हालचालींना वेग
आजच्या सोडतीनंतर महाबळेश्वर तालुक्यात
- संघटनात्मक मांडणी
- उमेदवारांची निवड
- स्थानिक आघाड्या आणि गटबाजी
यांना अधिक वेग येणार आहे. तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षांसोबतच स्थानिक नेतृत्वही पुढील रणनीती आखण्यात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे.
सोडतीचा अधिकृत निकाल घोषित होताच तालुक्यातील आगामी निवडणूक वातावरण अधिक तीव्र होणार असून, कोणत्या गणात कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निश्चित होते, यावर तालुक्यातील निवडणूक चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment