महाबळेश्वर तालुक्यात भाजपचा शक्तिप्रदर्शनाचा संकल्प – आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष अतूल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार

महाबळेश्वर तालुक्यात भाजपचा शक्तिप्रदर्शनाचा संकल्प – आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार
जिल्हाध्यक्ष अतूल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार

जितेंद्र कारंडे,

प्रतापगड प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी महाबळेश्वर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाबळेश्वर आणि पाचगणी नगरपरिषद निवडणुका तसेच तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवेल, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

ही बैठक सातारा जिल्हा भाजप अध्यक्ष आणि आमदार मा. अतूल ‘बाबा’ भोसले यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आगामी निवडणूक रणनितीबाबत सूचना दिल्या असून, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


“गल्लीतून दिल्लीपर्यंत आमची सत्ता” – संघटन बळावर विश्वास

बैठकीत भारतीय जनता पक्षाची ताकद लोकशाही पद्धतीने संघटन उभारणीच्या माध्यमातून वाढली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. "संघटन शक्तीच्या जोरावर आज गल्लीतून दिल्लीपर्यंत सत्ता टिकवून ठेवणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे," असे मत श्री. प्रीतिक पाटील, जिल्हा प्रतिनिधी यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील भाजपा ही एक बलाढ्य राजकीय ताकद असून, आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाने वारंवार आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. याच धर्तीवर आता महाबळेश्वर तालुक्यातही निर्णायक लढत देण्यासाठी पक्ष पूर्णपणे सज्ज असल्याचे बैठकीत घोषित करण्यात आले.


साडेचार हजार सदस्यांची नोंदणी – भाजपची तयारी भक्कम

तालुक्यात नुकत्याच झालेल्या प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेत भारतीय जनता पक्षाने तब्बल साडेचार हजार सदस्यांची नोंदणी केली आहे. हा आकडा महाबळेश्वर तालुक्यातील जनसमर्थन आणि पक्षाच्या वाढत्या प्रभावाची साक्ष असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांचा फैलाव भाजपच्या बाजूने होण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय निरीक्षक मानत आहेत.


बैठकीत प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या बैठकीस भाजपा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष अतूल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत प्रितीक पाटील (जिल्हा प्रतिनिधी), माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते रवी कुंभारदरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, भाजप कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सनी मोरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा व अर्बन बँक संचालिका उषा ओंबळे, तसेच चिन्मय आगरकर, ओमकार दिक्षित, राजेंद्र पवार, सागर भिलारे, वृषाली डोईफोडे, पूनम भिलारे, मनोहर मोरे, संदीप आखाडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल लांगी, ओमकार पवार, ऋषी सपकाळ, तेजस मोरे, आविष्कार केळगणे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


"कमालीचा आत्मविश्वास, स्पष्ट धोरण" – सनी मोरे

या बैठकीनंतर भाजपा नेते सनी मोरे यांनी सांगितले –
“महाबळेश्वर तालुक्यात भाजपा नेहमीच विकासाच्या मुद्द्यांवर काम केले आहे. साडेचार हजार अधिकृत सदस्य ही ताकद कमी नाही. प्रत्येक विभागात आमचे उमेदवार तयार आहेत आणि जनतेच्या पाठिंब्यावर आमचा विश्वास आहे. जिल्हाध्यक्ष अतूल भोसले यांच्या आदेशानुसार आगामी निवडणुकांसाठी दिशा आखली जाईल आणि निर्णायक विजय मिळवू.”


महाबळेश्वर तालुक्यात भारतीय जनता पक्षाने लढाईची रणशिंग फुंकली असून पुढील काही दिवसांत उमेदवारांची तयारी आणि निवडणूक रणनीती जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


— "माझं गाव माझी बातमी" ✍️

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl