महाबळेश्वर तालुका शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुखपदी गणेश उतेकर यांची नियुक्ती; तरुण, अभ्यासू नेतृत्वाला संधी
महाबळेश्वर तालुका शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुखपदी गणेश उतेकर यांची नियुक्ती; तरुण, अभ्यासू नेतृत्वाला संधी
राजेश सोंडकर,
महाबळेश्वर प्रतिनिधी:
महाबळेश्वर तालुक्यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या संघटनेला मोठे बळ मिळाले असून, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाबळेश्वर तालुकाप्रमुखपदी श्री. गणेश नामदेव उतेकर यांची अधिकृतपणे नियुक्ती केली आहे. गणेश उतेकर हे साहेबांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्या या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
*अष्टपैलू व अभ्यासू नेतृत्व*
गणेश उतेकर अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत असून त्यांना महाबळेश्वर तालुक्यातील राजकारणाचा चांगला अभ्यास आहे.
*▪️जनतेच्या प्रश्नांची जाण:* ते नेहमीच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतात.
*▪️उत्कृष्ट वक्तृत्व शैली:* त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व शैली असल्याने सभा जिंकण्याचे कौशल्य आहे.
*▪️प्रशासकीय कामाची आवड:* ते शासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे फॉर्म मोफत भरून दिले, तसेच 'शासन आपल्या दारी' सारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांची प्रशासकीय कामे करून देण्यासाठी पुढाकार घेतला.
*▪️सहकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान*
उतेकर यांचे केवळ राजकारणातच नव्हे, तर सहकार आणि उद्योग क्षेत्रातही मोठे योगदान आहे:
*▪️कोयना माई पतसंस्था:* त्यांनी कोयना माई महिला सहकारी पतसंस्था उभारणीत महत्त्वाचे योगदान दिले. तापोळा विभागातील महिलांना संघटित करून बचत व आर्थिक प्रगतीसाठी ही संस्था आज अग्रगण्य ठरली आहे.
*▪️कृषी पर्यटन:* त्यांनी कृषी पर्यटन या व्यवसायाला गती दिली. तापोळा व परिसरात ही संकल्पना रुजवून अनेक तरुणांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले आणि स्वतःही एक यशस्वी उद्योजक म्हणून लौकिक मिळवला.
*▪️संवेदनशील मदतीसाठी तत्पर:* कोरोना काळात आणि अतिवृष्टीमध्ये गणेश उतेकर व त्यांच्या मित्र परिवाराने जवळपास दोन हजार कुटुंबांपर्यंत विविध साहित्याच्या स्वरूपात प्रत्यक्ष मदत पोहोचवली.
*हिंदुत्ववादी चेहरा आणि शिवसैनिकांचा विश्वास*
गणेश उतेकर यांची ओळख अनेक वर्षांपासून एक निडर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आहे. झोळखिंड येथील एका वृद्ध व्यक्तीच्या संशयित मृत्यूला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी महाबळेश्वर बंदची हाक दिली होती, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
तापोळा विभागात शिवसेनेचा पक्ष मजबूत ठेवण्यात त्यांचे मोठे परिश्रम आहेत. त्यांनी गावात शिवसेनेच्या विचारांचे सरपंच निवडून यावेत यासाठी मेहनत घेतली, ज्यामुळे आज अनेक गावांमध्ये शिवसेनेचे सरपंच विकासाच्या कामांसाठी पुढाकार घेत आहेत.
*नेतृत्व, कर्तुत्व आणि वक्तृत्व* या तिन्ही गुणांनी समृद्ध असलेले गणेश उतेकर हे महाबळेश्वर तालुक्याच्या शिवसेना पक्षाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा निर्भीड वक्ता तालुकाप्रमुख झाल्याने आता संघटना अधिक मजबूत होईल आणि पक्ष वाढीवर अधिक भर दिला जाईल, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment