पोलादपूर तालुक्यात राजकीय आखाडा रंगणारशिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची काटे की टक्कर — दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती सदस्य पदांसाठी चुरस वाढली
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची काटे की टक्कर — दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती सदस्य पदांसाठी चुरस वाढली
पोलादपूर विशेष प्रतिनिधी –
पोलादपूर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच पोलादपूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती सदस्य पदांसाठी शाब्दिक चकमकी, अंतर्गत राजनीती आणि कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला — पण २०१७ ची जखम अद्याप ताजी
पोलादपूर तालुका हा शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जातो. शिवसेनेच्या स्थापनेपासून इथल्या भूमीत भगव्या राजकारणाचे वर्चस्व होते.
मात्र २०१७ मधील निवडणुकीत गटबाजीमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला भेदला गेला आणि काँग्रेसचा सभापती पंचायत समितीवर विराजमान झाला.
त्या पराभवानंतर आत्मचिंतन व्हायला हवे होते, असा सवाल आता निष्ठावंत कार्यकर्त्यांतून ऐकू येतो.
> “एकजीव असणारी शिवसेना निवडणुकीच्या वेळी मात्र तुकडे तुकडे का होते?” — कार्यकर्त्यांचा सवाल
उमेदवारीवरून असंतोष — ‘इतर पक्षातून आलेलाच उमेदवार का?’
कापडे बु जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी चर्चा सुरू…
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन मोठे नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, शिवसेनाच्याच काही पदाधिकाऱ्यांचा आशिर्वाद मिळत असल्याच्या टिप्पणीही रंगल्या आहेत.
निष्ठावंत शिवसैनिक मात्र प्रश्न उपस्थित करत आहे
“७० टक्के आमचे शिवसैनिक असताना, सक्षमउमेदवार आमच्याकडे असताना नेहमीच इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्याला का संधी ?” हा प्रश्न सर्व सामान्य शिवसैनिक विचारत आहेत
“नेहमी गयाराम–आयरामवरच अवलंबून राहणार?” का सर्व सामान्य शिवसैनिकाला संधी देणार? ह्याच उत्तर गेली अनेक वर्षे नेतृत्व करणारांनी द्यायला हवं की आपल्या स्वार्थासाठी निष्ठावंत शिवसैनिकांचा बळी देणार
यामुळे शिवसेनेच्या तळागाळात नाराजीचा सूर तीव्र होत चालल्याचे समोर येत आहे.
मतांचे विभाजन — निकालावर ‘अनपेक्षित’ परिणाम?
स्थानिक राजकीय समीकरणे पाहता काही निष्ठावंत अपक्ष म्हणून उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
असे झाल्यास मतांचे विभाजन होऊन पराभवाची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची तगडी तयारी
ग्रामपंचायतीपासून तालुका, जिल्हास्तरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पोलादपूरकडे जातीने लक्ष घातले तर दिसून येत आहे तर स्थानिक कार्यकर्ते आणि माजी पदाधिकार्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून संघर्ष चुरशीचा होणार आहे.
प्रचारयुद्धाचा धुरळा उडणार
गावागावात बैठका, घराघरांत चर्चा, नेत्यांच्या सततच्या भेटीमुळे तालुका निवडणुकीच्या मूडमध्ये शिरला आहे. लवकरच उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होताच राजकीय तापमान आणखी चढेल.
✅ कोण टिकवणार आघाडी?
विधानसभा निवडणुकीत शिंदे गट शिवसेनेने चारही पंचायत समिती गणात आघाडी घेतली होती.
हीच आघाडी राखण्यात यश येईल का?
की पुन्हा अंतर्गत गटबाजीमुळे सत्तेवर गदा येईल?
याचे उत्तर मतपेट्याच देणार…
---
पोलादपूर तालुक्यात शिवसेनेच्या
‘मातीतून उगवणाऱ्या नेतृत्वाचे राजकारण की बाहेरून येणारी नेमणूक?’ लोकांना काय पसंत पडेल
याचा फैसला येत्या निवडणुकीत होणार असल्याने
संपूर्ण परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे!
Comments
Post a Comment