महाबळेश्वरात भाजप मंडळाची बैठक; स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक रणनीती अंतिम



महाबळेश्वरात भाजप मंडळाची बैठक; स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक रणनीती अंतिम

विलास काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाबळेश्वर येथे भारतीय जनता पार्टी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना बळकट करणे, जनसंपर्क वाढविणे आणि मतदारांपर्यंत सरकारच्या विकासपर्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याची रणनीती यावेळी आखण्यात आली.

बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मार्गदर्शन करताना केंद्रीय व राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी सक्षम समन्वय आणि कार्यकर्त्यांच्या सक्रियतेची गरज अधोरेखित केली. महाबळेश्वर तालुक्यातील विकासकामांना मिळत असलेला वेग आणि त्यातून निर्माण झालेला जनतेचा विश्वास आगामी निवडणुकांत पक्षाला सकारात्मक परिणाम देईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या बैठकीत विविध संघटनात्मक बाबींसह बूथस्तरावरील बळकटीकरण, नवमतदार नोंदणी, डिजिटल माध्यमातून प्रचार, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण उपक्रम, महिला व युवा शक्तीचा प्रभावी सहभाग यांसारख्या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्यात आले.

बैठकीस जिल्हा प्रमुख अतूल बाबा भोसले, महिला मोर्चा जिल्हा प्रमुख सूरभी ताई भोसले, भाजप कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्रचे सनी मोरे, रवि कुंभारदरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा उषा ओंबळे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैशाली भिलारे, मंडल प्रमुख अनिल भिलारे व बबन उतेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल लांगी, चिन्मय आगरकर, राजेंद्र पवार, ओमकार पवार, सतिश साळूंखे, गोपाळ लालबेग, करण जाधव, अक्षय सपकाळ, रूषि सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह, निष्ठा आणि संघटनशक्ती पाहता भारतीय जनता पार्टी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत यशाचा नवा इतिहास घडवेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांची भक्कम उपस्थिती पाहता भाजपची निवडणूक तयारी अधिक वेग घेणार हे स्पष्ट झाले आहे.

.……..............................................................

पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या बळावरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आली असून भारतीय जनता पार्टी निश्चितच पालिकेत यशाचा नवा इतिहास घडवेल, असा विश्वास माजी नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांनी व्यक्त केला.

......................................................................

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl