दुबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच श्रीज्ञानदेवारी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव. प्रवीण महाराज शेलार यांचे दुबईमध्ये कीर्तन
दुबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच श्रीज्ञानदेवारी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव
प्रवीण महाराज शेलार यांचे दुबईमध्ये कीर्तन
रवी चव्हाण,
मेढा प्रतिनिधी :
दुबई येथे महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अनोखा सोहळा साकारला जाणार आहे. श्री विठ्ठलधाम प्रतिष्ठान पंढरपूर क्षेत्र आंबेघर यांच्या पुढाकारातून दुबई येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय ग्रंथराज श्रीज्ञानदेवारी सामुदायिक पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव भव्य उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
📖 कार्यक्रमाची रूपरेषा
या विशेष महोत्सवात ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत होणार असून, पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. श्री. एकनाथ महाराज कोष्टी करणार आहेत. यावेळी मार्गदर्शक व पारायण नेतृत्वाचे विशेष मार्गदर्शन भाविकांना लाभणार आहे.
🎶 कीर्तन सेवा
-
५ ऑक्टोबर २०२५ : सकाळी ९ ते ११ वा.
ह.भ.प. लाधूमहाराज रसाळ यांचे कीर्तन -
६ ऑक्टोबर २०२५ : सकाळी ९ ते ११ वा.
ह.भ.प. प्रवीणमहाराज शेलार यांचे कीर्तन -
७ ऑक्टोबर २०२५ : सकाळी ९ ते ११ वा.
ह.भ.प. प्रमोदामहाराज जगताप यांचे काल्याचे कीर्तन
🌸 संतपरंपरेचा जागतिक प्रसार
दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी प्रथमच होणाऱ्या या सामुदायिक पारायण व कीर्तन महोत्सवामुळे भारतीय संत साहित्य, भक्तिपरंपरा आणि अध्यात्म यांचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार होणार आहे. परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी हा सोहळा आत्मिक ऊर्जा व सांस्कृतिक बंध जपणारा ठरेल.
🙏 भाविकांना आवाहन
विठ्ठलनामाचा गजर, ज्ञानेश्वरीचे चिंतन आणि संतवाङ्मयाचे रसग्रहण करण्यासाठी दुबई व परिसरातील सर्व मराठी बांधवांनी या महोत्सवात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments
Post a Comment