महाबळेश्वर तालुका युवा सेनेच्या अध्यक्षपदी रंजीत शिंदे यांची नियुक्ती . युवाशक्ती संघटन बळकटीच्या दिशेने मोठे पाऊल – तालुक्यात आनंदाचा उत्साह
महाबळेश्वर तालुका युवा सेनेच्या अध्यक्षपदी रंजीत शिंदे यांची नियुक्ती
युवाशक्ती संघटन बळकटीच्या दिशेने मोठे पाऊल – तालुक्यात आनंदाचा उत्साह
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत दरे गावचे सुपुत्र आणि सर्वात तरुण सरपंच म्हणून ओळखले जाणारे रंजीत संभाजी शिंदे यांची महाबळेश्वर तालुका युवा सेना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी तळदेव व भिलार जिल्हा परिषद गट निवडणुका आणि महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
ही नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. दरे येथे झालेल्या नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात घोषणा देत रंजीत शिंदे यांचे स्वागत केले.
संघटनात नवचैतन्य
रंजीत शिंदे यांच्या नियुक्तीने कोयना, सोळशी, कांदाटी, वाडा-कुंभरोशी, पाचगणी, भिलार, माचूतर आणि महाबळेश्वर क्षेत्रातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे तालुक्यात युवकांना संघटनेत योग्य दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रंजीत शिंदे हे दरे तांब आणि पिंपरी तांब गावाचे सरपंच असून युवकांमध्ये त्यांचा व्यापक संपर्क आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते गणेश उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संघटनात कार्य करताना ओळख निर्माण केली आहे. तर संभाजी भिलारे गुरुजी, संजय मोरे, प्रवीण भिलारे, संजय ओंबळे, अजित संकपाळ आणि सचिन कदम यांच्यासह शिवसेनेतील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या निवडीचे स्वागत केले. तसेच वाई विधानसभा प्रमुख वर्षाताई आरडे, महाबळेश्वर तालुका प्रमुख मेघा चोरगे, तालुका प्रमुख सोनाली बांदल, पाचगणी शहरप्रमुख संदीप शिंदे, युवा नेते सिद्धेश संकपाळ, रुपेश शिंदे, किरण शिंदे आणि ओमकार डीगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विकास आणि युवकांच्या प्रगतीचा संकल्प
या वेळी रंजीत शिंदे यांनी सांगितले की,
“माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही तडा जाऊ देणार नाही. महाबळेश्वर तालुक्यातील युवकांना संघटनेत स्थान देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिवसेनेच्या माध्यमातून विकासकामे गावागावात पोहोचवून पक्ष तळागाळात मजबूत करू.”
या नियुक्तीमुळे महाबळेश्वर तालुक्यात युवा सेनेचे संघटन अधिक प्रभावी होणार असून आगामी निवडणुकांत युवकांची महत्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत रंजीत शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
— "माझं गाव माझी बातमी" ✍️
Comments
Post a Comment