पोलादपूर तालुक्यात उबाठा गटाला खिंडार!पाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेत शक्तीप्रदर्शन; कोंढवी विभागातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
पाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेत शक्तीप्रदर्शन; कोंढवी विभागातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
प्रकाश कदम ,
पोलादपूर प्रतिनिधी –
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पोलादपूर तालुक्यातील कोंढवी विभागात राजकीय भूकंप घडला आहे. उबाठा गटाला मोठे खिंडार पाडत, कोंढवी विभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे तालुक्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे नेतृत्व कोंढवी विभागप्रमुख श्री. मंगेश मोरे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवरील अनेक प्रभावी कार्यकर्ते, माजी पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
प्रवेशकर्त्यांमध्ये श्री. मंगेश मोरे (विभागप्रमुख), श्री. कृष्णकांत दरेकर (ग्रामपंचायत सदस्य), श्री. अमोल मोरे (माजी सरपंच), श्री. नंदकुमार निकम (शाखाप्रमुख), तसेच श्री. रमेश दरेकर, विनायक दरेकर, नरेश दरेकर, शैलेश मोरे, नितीश दरेकर, मयुर मोरे, विराज दरेकर, रविंद्र मोरे, शिवाजी मोरे, हनुमंत पालांडे, सुरेश पवार, किशोर मोरे, सागर दरेकर, संतोष मोरे, सौरभ पवार, राज मोरे, रामभाऊ धोत्रै, लक्ष्मण धोत्रै, जय धोत्रै, मनोज गमरे, चंद्रकांत यादव, सिध्दार्थ सोनावणे, सुरेश मुकणे, पांडुरंग वाघे, संतोष पवार, युवराज धोत्रै आणि सुरेश मुकणे यांचा समावेश होता. त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश करून सभागृह दणाणून टाकले.
या वेळी शिवसेना नेते व नामदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेतला. स्वागतपर भाषणात मंत्री गोगावले म्हणाले,
> “शिवसेना ही माणूस ओळखून मान देणारी पार्टी आहे. आज तुम्ही ज्या आत्मियतेने आमच्या परिवारात सामील झाला आहात, त्याच आत्मियतेने तुमचं स्वागत आणि सन्मान राखला जाईल.”
नवागत कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले,
> “आमदार व मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांमुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. ग्रामविकास, रस्ते, शिक्षण आणि रोजगाराच्या दिशेने त्यांच्या कार्याने आम्हाला खात्री दिली की खरा जनतेचा पक्ष म्हणजे शिवसेना. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू.”
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख सतीश शिंदे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, अनिल भिलारे, तसेच विविध विभागांतील शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर झालेला हा पक्षप्रवेश केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, तो तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणारा ठरला आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात यामुळे “पोलादपूर तालुक्यातील आगामी निवडणुकांचे गणित बदलणार का?” अशी चर्चा रंगली आहे.
शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली नव्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीने उबाठा गटासमोर आव्हान उभे राहिले असून, पोलादपूर तालुक्यातील राजकीय रंगमंच आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Post a Comment