महाबळेश्वर तालुका शिवसेना बैठक: नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, आगामी निवडणुकीसाठी उत्साहजनक चर्चा
महाबळेश्वर तालुका शिवसेना बैठक: नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, आगामी निवडणुकीसाठी उत्साहजनक चर्चा
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील पूर्व-पश्चिम विभागासाठी आयोजित झालेली शिवसेना बैठक हॉटेल आराम, महाबळेश्वर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत सातारा जिल्हा प्रमुख रंजीत दादा भोसले, जिल्हा समन्वयक प्रदीप दादा माने, नविन निर्वाचित लोकसभा युवासेना अध्यक्ष मेजर राजू दादा केंजळे, सातारा जिल्हा युवा प्रमुख संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, तसेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भाऊ नायडू यांनी केले, तर प्रस्तावना लक्ष्मण दादा कदम यांनी मांडली.
बैठकीत महाबळेश्वर तालुका उपजिल्हाप्रमुख पदी संजय दादा शेलार, उपजिल्हा संघटक पदी समीर दादा चव्हाण, तसेच पश्चिम तालुका प्रमुख पदी गणेश उतेकर यांची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते आणि सातारा जिल्हा प्रमुख रणजीत दादा भोसले यांच्या उपस्थितीत दिले गेले.
बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी टाळ्या, कङकङा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्साहपूर्ण स्वागत केले. प्रदीप दादा माने यांनी मनोगत व्यक्त करून एकजूट आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. जिल्हा प्रमुख रणजीत दादा भोसले यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेत भगवा फडकवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी महाबळेश्वर तालुक्यात आणि शहराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई यांनी दिलेल्या निधीमुळे झालेल्या विकासाचा लाभ घेऊन यश मिळवण्यावर भर दिला.
यावेळी आगामी १५ ऑक्टोबर रोजी सातारा येथे आयोजित होणाऱ्या मेळाव्यासाठी तालुका व शहरातील शिवसेना, युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी:
चंदू गुरुजी, बाजीराव दादा, संजय ओंबळे, माजी नगरसेविका संगीताताई गोंदकर, संभाजी भिलारे, जेके दादा अमराळे, वर्षा आरडे, मेघा चोरगे, सुनीता फळणे, शितल ओतारी, सोनाली बांदल, मंगल फळणे, सुरेखा पंडित, अर्चना जाधव, प्रभा नायडू, अपूर्वा डोईफोडे, सुवर्णा उगले, कविता साळुंखे, सुनील ढेबे, सचिन गुजर, सचिन जेधे, उस्मान खारखंडे, गोविंद कदम, सचिन ओतारी, गौरव राक्षे, अनिरुद्ध धोत्रे, विजय चोरगे, प्रकाश जाधव, किरण मोरे, राहुल साळुंखे, लक्ष्मण दादा कदम, बाळू माने, सुनील कदम, हरीश जाधव, राहुल शिंदे.
यावेळी शिवसेनेत नव्या प्रवेशार्थींनाही स्वागत करण्यात आले. महाबळेश्वर शहर प्रमुख विजय भाऊ नायडू यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
महाबळेश्वर तालुका शिवसेनेची ही बैठक संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी स्थानिक निवडणुकीत यश मिळवण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.
Comments
Post a Comment