म’श्वरची अभिमानकन्या कृष्णा पवारचा सत्कार ✨आंतरराष्ट्रीय मैदानावर ‘गोल्ड’ची चमक दाखवण्याचा निर्धार
म’श्वरची अभिमानकन्या कृष्णा पवारचा सत्कार ✨
आंतरराष्ट्रीय मैदानावर ‘गोल्ड’ची चमक दाखवण्याचा निर्धार
प्रेषित गांधी,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ – खेलोत्सव स्पर्धेत गोळाफेक आणि थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी महाबळेश्वरची कु. कृष्णा प्रमोद पवार हिने पुन्हा एकदा आपली जोरदार कामगिरी कायम ठेवत राष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्णपदके आपल्या नावे केली आहेत.
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील अटल बिहारी वाजपेयी दिव्यांग खेल प्रशिक्षण केंद्रात एका वर्षाच्या विशेष प्रशिक्षणासाठी तिची पूर्वी निवड झाली होती. त्याच प्रशिक्षणाचा परिणाम म्हणून १४ व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये थाळीफेक, गोळाफेक व भालाफेक या तिन्ही प्रकारात सुवर्णपदक मिळवून उत्तुंग यश प्राप्त केले.
यशाच्या या शिखरावर पोहोचताना कृष्णाच्या पाठीशी तिच्या आई मीनाक्षी पवार आणि वडील प्रमोद पवार (पेशाने टॅक्सी चालक) यांचे मोठे योगदान असून, त्यांच्या त्याग आणि पाठिंब्याचा गौरव करण्यासाठीच तिच्या वास्तव्य असलेल्या मुन्नवर हौसिंग सोसायटीतर्फे कृष्णा आणि तिच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.
🎤 कृष्णाचा ‘गोल्डन’ संकल्प
या सत्कारावेळी बोलताना कु. कृष्णा पवार म्हणाली,
“देशासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणे हाच एकमेव लक्ष्य आहे. त्यासाठी मी सतत मेहनत घेत राहणार आहे.”
🏅 पुढील वाटचालीस सहकार्याची हमी
माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी कृष्णाचे अभिनंदन करताना म्हणाले,
“कृष्णा ही महाबळेश्वरची शान आहे. तिच्या भावी स्पर्धांसाठी लागेल ते सहकार्य व मदत आम्ही नक्की करू.”
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
या प्रसंगी
- माजी नगरसेवक कुमार शिंदे
- सोसायटी चेअरमन कोंडीराम बुवा आखाडे
- व्हाइस चेअरमन नदीम वारूणकर
- माजी नगरसेवक फकीरभाई वलगे
- सौ. न्याजबी वारूणकर
- एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक जाधव
- विजय जाधव, गणेश बर्गे, रमेश घाडगे
- आकाश शेलार, सुमित कांबळे
यांच्यासह महिला सदस्य व सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु. कृष्णा प्रमोद पवार हिच्या या शानदार कामगिरीमुळे महाबळेश्वरचाच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही कृष्णा भारताचा तिरंगा उंच नेईल, अशी सर्वांनी मनापासून आशा व्यक्त केली आहे. 🇮🇳✨
Comments
Post a Comment