श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा तेजस माने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम

श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा तेजस माने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम
विभागीय स्तरावर निवड; विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा अभिमान

राजेश सोंडकर,

महाबळेश्वर प्रतिनिधी :

सातारा जिल्ह्याचा मान उंचावत श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी, सोनवडी-गजवडी संचलित श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी तेजस माने याने जिल्हास्तरीय कुस्ती (ग्रीको-रोमन) स्पर्धेत १९ वर्षाखालील ७२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तेजसची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे.

कुस्तीप्रेमी विद्यार्थी म्हणून तेजस माने याने सातत्याने मेहनत, शिस्त आणि खेळावरील निष्ठा याच्या जोरावर ही कामगिरी साधली आहे. जिल्हास्तरावर झालेल्या स्पर्धेत त्याने अनेक प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. त्याच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण सोनवडी-गजवडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

या यशाबद्दल श्री समर्थ एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री इसुब पटेल, सचिव श्री झणझणे सर, हिशोबणीस श्री धनाजी कदम, सहसचिव श्री महेश कदम तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे सर, क्रीडाशिक्षक आणि ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांनी तेजसचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

संस्थेचे सचिव श्री झणझणे सर यांनी सांगितले की, “तेजसने दाखवलेली मेहनत आणि चिकाटी ही सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळे आमच्या संस्थेचा लौकिक अधिक वाढतो.”

तेजस मानेच्या या कामगिरीमुळे विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वृद्धिंगत झाला असून विभागीय स्तरावरही तो विजेतेपद पटकावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl