वक्तृत्व स्पर्धेत मीत जाधव महाबळेश्वर तालुक्यात प्रथम


वक्तृत्व स्पर्धेत मीत जाधव महाबळेश्वर तालुक्यात प्रथम

विलास काळे,

महाबळेश्वर  प्रतिनिधी:

विद्यार्थी दिनाच्या औचित्याने महाबळेश्वर तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली येथील विद्यार्थी मीत विजय जाधव याने प्रथम क्रमांक पटकावून चमकदार यश मिळवले आहे. या यशामुळे त्याची सातारा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याच्याकडून पुढील स्तरावरही उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथील प्रवेशदिनानिमित्त हा विद्यार्थी दिन शासनाच्या वतीने साजरा केला जातो. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत मीत जाधवने उत्कृष्ट विचारमंथन, प्रभावी वक्तृत्वशैली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. याच शाळेतील प्रथम आखाडे या विद्यार्थ्याने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, सलग चार वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली येथील विद्यार्थी या स्पर्धेत सातत्याने यश संपादन करत आहेत.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे, तसेच उपशिक्षक महेश पवार आणि सचिन जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी विजय विभूते, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे, केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम, तसेच दगडू ढेबे, संजय पारठे, विनायक पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लता जाधव आणि स्थानिक ग्रामस्थ संतोष जाधव, संपत जाधव, कोंडीबा जाधव, संतोष मोरे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl