जावळी तालुक्यातील शिक्षक संघात मोठा प्रवेश; तानाजी आगुंडे यांच्यासह ४० शिक्षकांचा समावेश


जावळी तालुक्यातील शिक्षक संघात मोठा प्रवेश; तानाजी आगुंडे यांच्यासह ४० शिक्षकांचा समावेश

मेढा प्रतिनिधी:

जावळी तालुक्यातील शिक्षक संघात मोठा तडकाफडका घडत असून संघाची ताकद आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. शिक्षक समितीचे शिलेदार आणि कोयना विभागातील शिक्षक नेते तानाजी आगुंडे यांनी रविवारी “संघ शक्ती युगे युगेचा” असा नारा देत जवळपास ४० शिक्षकांना सोबत घेऊन शिक्षक संघात प्रवेश करण्याची तयारी केली आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

या प्रवेशामुळे शिक्षक समितीला मोठे नुकसान होणार असून, संघाची ताकद आणि प्रभाव अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष उदय शिंदे शिक्षक समितीतील पडझडी रोखण्यात अपयशी ठरले होते. २०२२ मध्ये झालेल्या शिक्षक बँक निवडणुकीत उदय शिंदे यांना जावळी तालुक्यातील उमेदवार निवडून आणण्यात अयश मिळाले होते. समितीतील नेतृत्वाच्या कमतरतेमुळे गेल्या दोन टर्म शिक्षक बँक निवडणुकीत यश मिळवता आले नाही.

या पार्श्वभूमीवर, शिक्षकांचे प्रश्न सोडवणे आणि पुढील राजकीय दृष्टीकोन लक्षात घेऊन तानाजी आगुंडे यांनी शिक्षक समितीला रामराम करत जावळी तालुक्यातील शिक्षक संघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगुंडे यांच्यासह सुमारे ४० शिक्षक संघात प्रवेश करत असल्यामुळे संघाची ताकद आणि प्रभाव आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रविवारी मेढा येथे शिक्षक संघाचे तालुकास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले, ज्यात बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. अधिवेशनात मंत्रीांनी फोनद्वारे प्रवेश झालेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आणि बामनोली विभागात पुढील संघाचे अधिवेशन घेण्याबाबत आपले संकल्प शब्द दिले. त्यांनी स्पष्ट केले की, ते स्वतः त्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत, असा विश्वास शिक्षक संघाच्या नेतृत्वाला दिला.

अधिवेशनात शिक्षक संघाच्या नवीन नेतृत्वाची देखील नियुक्ती करण्यात आली:

  • अध्यक्ष: तानाजी आगुंडे (बामणोली भाग)
  • कार्याध्यक्ष: जालिंदर सुतार
  • कोषाध्यक्ष: दत्तात्रय चिकणे
  • सरचिटणीस: संदिप किर्वे (कुडाळ विभाग)
  • संघाचे नेते: संजय धनावडे (पश्चिम भाग)

अधिवेशन यशस्वी रित्या संपन्न झाले असून, या प्रवेशामुळे जावळी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नेतृत्व आणि संघटनात्मक ताकद अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षक संघातील नवीन नेतृत्व आणि मंत्री भोसले यांच्या सहकार्यामुळे शिक्षकांचे प्रश्न लवकर सोडवण्यास मदत होईल अशी देखील माहिती मिळाली आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl