जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ : प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ : प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार

विलास काळे 

महाबळेश्वर  प्रतिनिधी :

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेतील पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणून गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी उद्या, दि. ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

ही प्रारूप मतदार यादी महाबळेश्वर तहसिल कार्यालयासह संबंधित सर्व पंचायत समिती क्षेत्रातील कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत सर्वसामान्य नागरिकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना आपल्या नावाची, घर क्रमांकाची, मतदार क्रमांकाची आणि इतर तपशीलांची पडताळणी करण्याची संधी या यादीतून मिळणार आहे.

प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि. ०८ ऑक्टोबर ते दि. १४ ऑक्टोबर २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी आपले नाव व तपशीलात काही चुका असल्यास किंवा सुधारणा आवश्यक असल्यास संबंधित तहसिलदार कार्यालयात कार्यालयीन वेळेत हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

हरकती व सूचनांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल. त्याच दिवशी मतदान केंद्रांची यादीदेखील प्रसिध्द केली जाणार आहे.

या प्रक्रियेद्वारे मतदार नोंदणीतील पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रत्येक पात्र मतदाराने आपल्या नावाची पडताळणी करून मतदार यादीत आवश्यक दुरुस्त्या वेळेत करून घ्याव्यात, असे आवाहन महाबळेश्वरचे तहसिलदार सचिन मस्के यांनी केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl