पुणे येथील बालाजी ग्रुप व दुर्गामाता फाउंडेशनतर्फे कुंभरोशीतील विद्यार्थ्यांना दिवाळी भेट – ४५ गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना कपडे व खाऊ वाटप
पुणे येथील बालाजी ग्रुप व दुर्गामाता फाउंडेशनतर्फे कुंभरोशीतील विद्यार्थ्यांना दिवाळी भेट – ४५ गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना कपडे व खाऊ वाटप
प्रतापगड | प्रतिनिधी
संपूर्ण समाजघटकांसाठी दिवाळी ही आनंदाची आणि स्नेहाची पर्वणी असते. या सणाचा आनंद वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पुणे येथील बालाजी ग्रुपचे सदस्य आणि दुर्गामाता फाउंडेशन यांच्या वतीने आज जिल्हा परिषद शाळा, कुंभरोशी येथील ४५ गरीब व गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त नवीन कपडे आणि खाऊ वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर पालकांच्या डोळ्यांत समाधानाचे भाव उमटले. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून, त्या दिशेने बालाजी ग्रुप आणि दुर्गामाता फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना समाजसेवक महेश शिंदे यांनी सांगितले की,
“ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही शाळेला सर्वतोपरी सहकार्य करू. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये सुप्त क्षमता असल्याने त्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणासोबत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीही भविष्यात विविध उपक्रम राबविले जातील.”
यावेळी इतर मान्यवरांनीही ग्रामीण भागात अशा सकारात्मक सामाजिक उपक्रमांची सतत गरज असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमासाठी मेहनत घेणारे स्वयंसेवक, बालाजी ग्रुप आणि दुर्गामाता फाउंडेशनशी संबंधित सर्व सदस्य तसेच गावातील सहृदयी व्यक्ती यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की,
“सामाजिक सहकार्यामुळेच ग्रामीण शाळांचा विकास साधता येतो. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग, ग्रामस्थ व संस्थेतील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितीत शालेय विद्यार्थी, पालक आणि गावातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
Comments
Post a Comment