पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांनी ऑनलाईन नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन



पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांनी ऑनलाईन नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : 

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, पात्र मतदारांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तसेच पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी ऑफलाईनबरोबरच ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक पात्र मतदारांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावरून ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२६ मध्ये होणाऱ्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक ठरवून मतदार यादी नव्याने (De-Novo) तयार केली जात आहे. या मतदार नोंदणी कार्यक्रमात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील नोंदणीची प्रक्रिया पाहत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असले तरीही, या नव्या ‘डी-नोव्हो’ याद्यांमध्ये पुनः नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व पात्र पदवीधर, शिक्षक व शैक्षणिक कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदानाचा हक्क मजबूत लोकशाहीची पायाभूत शक्ती असल्याचे नमूद करत, मतदारांनी या प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl