रहिमतपूर मुस्लिम समाज व जनतेकडून पूरग्रस्तांना भरघोस मदत — मानवतेचा आदर्श दाखवणारी सेवा

रहिमतपूर मुस्लिम समाज व जनतेकडून पूरग्रस्तांना भरघोस मदत — मानवतेचा आदर्श दाखवणारी सेवा

राजेश सोंडकर,
महाबळेश्वर प्रतिनिधी :

मानवतेचा खरा धर्म जपत रहिमतपूर मुस्लिम समाजाने पूरग्रस्त बांधवांसाठी अनुकरणीय कार्य केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद वस्ती येथे झालेल्या पूरामुळे सुमारे २५० कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. यापैकी १२० कुटुंबांना रहिमतपूर मुस्लिम समाज तसेच सातारा जमाती ओलीमा हिंद यांच्या पुढाकाराने तातडीची मदत पोहोचविण्यात आली.

पूरस्थितीबाबत माहिती मिळताच रहिमतपूर मुस्लिम समाजातील बांधवांनी एकत्र येऊन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, अंथरूण, कपडे, पाण्याच्या बाटल्या इत्यादींच्या किट तयार केल्या. ही मदत विशेष वाहनांद्वारे औराद वस्तीतील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात आली. मदत वाटपाचे काम शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आले.

या मदतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला असून त्यांच्यात नवी आशा निर्माण झाली आहे. गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच स्थानिक मान्यवरांनी रहिमतपूर मुस्लिम समाजाचे आभार मानत या कार्याचे कौतुक केले.

या उपक्रमात अमीर साहेब, अमित भाई, मेहमूद भाई (बबलूभाई), फैयाज भाई, मुफती साहेब यांच्यासह रहिमतपूरमधील सर्व समाजबंधूंनी तन, मन आणि धनाने सहभाग घेतला. समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी “फुल ना फुलाची पाकळी” या भावनेतून पूरग्रस्तांना मदतीचा हात देत मानवतेचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले.

या सेवाभावी कार्यामुळे रहिमतपूर मुस्लिम समाजाने पुन्हा एकदा समाजातील एकता, करुणा आणि माणुसकीचा संदेश संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचवला आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl