महाबळेश्वरमध्ये शिवसेनेच्या बैठकीत मोठा उत्साह; सातारा येथील मेळाव्याची तयारी जोरात .



महाबळेश्वरमध्ये शिवसेनेच्या बैठकीत मोठा उत्साह; सातारा येथील मेळाव्याची तयारी जोरात .

जितेंद्र कारंडे,

प्रतापगड प्रतिनिधी – 

महाबळेश्वर शहरात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील बैठकीत मोठ्या प्रमाणात उत्साह आणि सहभाग दिसून आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑक्टोबर रोजी सातारा येथे होणार्‍या मेळाव्याची तयारी जोरात सुरू आहे.

गेल्या शुक्रवारी (दि. १० ऑक्टोबर २०२५) हॉटेल आराम, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाबळेश्वर तालुका पूर्व-पश्चिम आणि शहर विभागाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी सातारा जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रंजीत दादा भोसले, जिल्हा समन्वयक प्रदीप दादा माने, नवनिर्वाचित लोकसभा युवासेना अध्यक्ष मे. राजू दादा केंजळे, जिल्हा युवा प्रमुख संभाजी पाटील तसेच तालुका प्रमुख व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रस्तावना लक्ष्मण दादा कदम यांनी सादर केली.

बैठकीत सातारा जिल्हा प्रमुखांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत म्हटले की, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजूट साधून काम करावे.

या बैठकीत महाबळेश्वर तालुका उपजिल्हाप्रमुख, पश्चिम तालुका प्रमुख, पूर्व तालुका प्रमुख तसेच महिला पदाधिकारी यांची नियुक्ती पत्रे सुपूर्द करण्यात आली.

विशेष म्हणजे, महाबळेश्वर शहरातील व्यापारी मोहम्मद ऊनवाला आणि OBC संघटनेशी संलग्न सुनील यादव यांनी जिल्हा प्रमुख रंजीत दादा भोसले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मोहम्मद ऊनवाला होलसेल व्यापारी असून, सुनील यादव लॉन्ड्री व्यवसायाशी संबंधित आहेत.

बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी टाळ्या व कङकङा फटाक्यांच्या आवाजात उत्साह दाखवला. प्रदीप दादा माने यांनी मनोगत व्यक्त केले, तर जिल्हा प्रमुख रंजीत दादा भोसले यांनी सर्वांना संदेश दिला की, कोणतेही मतभेद न ठेवता एकजूट साधून आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवावे.

शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू यांनी उपस्थितांना आभार मानले आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सातारा येथील १५ ऑक्टोबरच्या मेळाव्यासाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात पूर्व-पश्चिम भागातील विविध तालुका, शहर व महिला पदाधिकारी, युवा सेना सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील शिवसेनेचा उत्साह स्पष्ट दिसून आला.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl