महाबळेश्वरमध्ये पारंपरिक उत्साहात शस्त्रपूजन सोहळा संपन्न विजयादशमी निमित्त संघटनात्मक एकात्मतेचा व शौर्यपरंपरेचा जागर.

महाबळेश्वरमध्ये पारंपरिक उत्साहात शस्त्रपूजन सोहळा संपन्न

विजयादशमी निमित्त संघटनात्मक एकात्मतेचा व शौर्यपरंपरेचा जागर

जितेंद्र कारंडे,

प्रतापगड प्रतिनिधी :

विजयादशमीच्या पवित्र पर्वानिमित्त रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी महाबळेश्वर येथे शस्त्रपूजन सोहळा अत्यंत पारंपरिक आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. हा सोहळा ड्रीम लँड हॉटेल, महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संपत व स्वागत प्रणामाने झाली. त्यानंतर ध्वजारोहण सोहळा पार पडला आणि ओंकार दीक्षित यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने वातावरण भक्तिमय झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन हे विजयजी पवार यांनी केले, तर प्रमुख पाहुणे व वक्त्यांचा परिचय प्रशांतजी यांनी करून दिला.

यानंतर कार्यक्रमातील सांघिक पथ्य सादरीकरण गणेशजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. ओंकार पवार यांनी सुभाषित सादर करून संस्कार आणि मूल्यांचा संदेश दिला. पुढे रवीजी अदेप्पा यांनी अमृतवचनांद्वारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गिरीश अशोक नायडू यांनी आपल्या मनोगतात विजयादशमीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व उलगडले. त्यांनी सांगितले की, “शस्त्रपूजन ही फक्त विधी नसून शौर्य, कर्तव्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे. समाजरक्षणासाठी सज्ज राहण्याची ही परंपरा आपल्याला आत्मबल देते.”

यानंतर मुख्य उद्बोधन वक्ते सुनील सूर्यवंशी (वाई) यांनी शौर्य, संघटन, आणि राष्ट्रनिष्ठेचे संदेश देत सर्वांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन तालुका कार्यवाहक विजय पवार यांनी केले.

कार्यक्रमानंतर महाबळेश्वर मार्केट परिसरात संचलन काढण्यात आले. शिस्तबद्ध संचलनाने परिसर दुमदुमून गेला. स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. शिस्तबद्ध संचलनाने महाबळेश्वर मधील वातावरणातत देशभक्ती निर्माण झाली.

विजयादशमीचा हा शस्त्रपूजन उत्सव केवळ धार्मिक विधी नसून, सामाजिक एकात्मतेचा आणि संघटनात्मक शिस्तीचा प्रेरणादायी सोहळा ठरला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl