दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस — उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांची माहिती

दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस — उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांची माहिती

 राजेश सोंडकर,

महाबळेश्वर प्रतिनिधी :

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! येत्या दिवाळीपूर्वी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सहानुग्रह अनुदान (बोनस) देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याचे आश्वासन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. राहुल देसाई यांनी दिले आहे.

दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने दिवाळी सहानुग्रह अनुदान देण्याबाबत मागणी निवेदन मा. देसाई यांना सादर करण्यात आले. यानंतर त्यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. चर्चेदरम्यान देसाई यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची दखल घेत दिवाळीपूर्वीच बोनस देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू आहे. सर्व तालुक्यांतील पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना लवकरच अधिकृत पत्र देण्यात येईल.”

या बैठकीस जिल्हाध्यक्ष रमेश भोसले, संस्थापक पंढरीनाथ मर्ढेकर, सचिव अजय वाघ, उपाध्यक्ष भिमाशंकर कोळी, ओमकार चिकणे, अमोल सणस, वैभव माणकुमरे, रविंद्र हिरवे, लक्ष्मण भिसे, विठ्ठल पाटील, विजय भोसले, हणमंत (सोन्या) देशमुख आदी पदाधिकारी तसेच संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते.

बैठकीत कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबतही सकारात्मक चर्चा झाली असून दिवाळीपूर्वीच बोनस वितरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl