भुईंज येथे भव्य हौशी व्हॉलीबॉल स्पर्धा : क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण
भुईंज येथे भव्य हौशी व्हॉलीबॉल स्पर्धा : क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण
भुईंज प्रतिनिधी :
भुईंज नगरीत सिमोल्लंघन उत्सव निमित्ताने आझाद हिंद मंडळ, भुईंज यांच्या वतीने भव्य हौशी व्हॉलीबॉल स्पर्धा रंगणार आहे. विश्वचेतन सद्गुरु पू. श्री नारायण (आण्णा) महाराज यांच्या आशिर्वादाने होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वा. होणार असून, रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी या क्रीडा पर्वाचा समारोप होईल.
पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार असून, भुईंज गावात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.
या सोहळ्याला मान्यवर उपस्थित राहून खेळाडूंना प्रेरणा देणार आहेत. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून
- मा. श्री. मदनदादा भोसले (माजी आमदार, वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा)
तसेच, - मा. श्री. तुषार दोशी (पोलीस अधीक्षक, सातारा)
- मा. श्री. विनोद कुलकर्णी (संपादक)
- मा. श्री. सयाजी शिंदे (अभिनेता)
- मा. श्री. हरीष पाटणे (पत्रकार)
- मा. श्री. सुनील साळुंखे (उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई)
- मा. श्री. रमेश गर्जे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, भुईंज)
हे मान्यवर आपल्या उपस्थितीने स्पर्धेची शोभा वाढवणार आहेत.
खेळाडूंच्या जोशात भर टाकण्यासाठी या स्पर्धेत आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
- प्रथम क्रमांक : रु. ११,०००/- (प्रायोजक – डॉ. सौ. सुषमाबाई भोसले)
- द्वितीय क्रमांक : रु. ९,०००/- (प्रायोजक – नारणगाव पाट येथील समाज बांधव व क. कृ. खंडेराव शंकर पवार)
- तृतीय क्रमांक : रु. ५,०००/- (प्रायोजक – श्री. मॅथशास्त्रज्ञ आधारदादा)
याशिवाय विजेत्या संघांना चषक व मानपत्रे देण्यात येणार आहेत.
प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण
या स्पर्धेसोबतच मित्र क्रीडा मंडळ, भुईंज यांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा १९ व २० सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली असून, क्रीडांगणात उत्साह व रोमांच अधिक रंगतदार होणार आहे.
या भव्य क्रीडा उपक्रमाचे आयोजन आझाद हिंद मंडळ, भुईंज यांनी केले असून, प्रमुख आयोजक म्हणून श्री. मिलिंद वायकर व श्री. अजित भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृती जपण्यासाठी व युवकांमध्ये उर्जा निर्माण करण्यासाठी मित्र क्रीडा मंडळ, भुईंज सातत्याने कार्यरत आहे.
👉 क्रीडा म्हणजे शिस्त, सामंजस्य व एकात्मतेचे द्योतक आहे. भुईंज येथे होणारी ही स्पर्धा युवकांना केवळ खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार नाही, तर एकात्मता आणि समाजबंध दृढ करणारा मौल्यवान संदेशही देणार आहे.
Comments
Post a Comment