पोलादपूर तालुक्यात सेवा पंधरवड्याअंतर्गत ग्रामसभांमध्ये व्यापक जनजागृती

पोलादपूर तालुक्यात सेवा पंधरवड्याअंतर्गत ग्रामसभांमध्ये व्यापक जनजागृती

तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा विशेष उल्लेख

पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)—
पोलादपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” तसेच “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या शासकीय सेवांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी माननीय प्रांत अधिकारी सरांनी कापडे बुद्रुक ग्रामसभेला प्रत्यक्ष हजेरी लावून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील पानंद मोजणीच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे यांनी ग्रामसभेला उपस्थित राहून गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या विविध योजना व सेवा पंधरवड्याअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे उद्दिष्ट आणि ऐतिहासिक महत्त्व ग्रामस्थांना सांगितले. या अभियानाद्वारे शेतकरी व सामान्य नागरिकांच्या हक्कांच्या जपणुकीसाठी शासन संवेदनशील असून, महसूल विभाग नागरिकाभिमुख सेवेकडे कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

ग्रामसभांमध्ये ग्रामीण भागातील विकासकामे, सार्वजनिक सेवा, जमिनीची मोजणी, जलसंधारण, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर चर्चा झाली. यावेळी नागरिकांना सेवा पंधरवड्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl