. आनंद जाधव यांच्या निधनाने हळहळ – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची देवळी येथे भेट

📰 कै. आनंद जाधव यांच्या निधनाने हळहळ – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची देवळी येथे भेट

 महाबळेश्वर (प्रतिनिधी) :
महाबळेश्वर तालुक्यातील देवळी येथील तरुण कै. आनंद जाधव यांच्या झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.

या दुःखद प्रसंगानंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी देवळी येथे जाऊन जाधव कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. “कै. आनंद जाधव यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो, हीच प्रार्थना. या कठीण काळात कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत,” अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी कुटुंबाला धीर दिला.

यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र शेठ राजपुरे, नितीन भिलारे यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. कुटुंबीयांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही दिले.

गावकऱ्यांनी सांगितले की, कै. आनंद जाधव हे परोपरी वृत्तीचे, समाजहिताचा विचार करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकस्मात निधनाने समाजातील एक सज्जन व्यक्ती हरपल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

गावात अनेकांनी जाधव कुटुंबाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली असून, “आनंद यांच्या आठवणी कायम समाजाच्या मनात जिवंत राहतील” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl