शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्रीराम वरदानी मातेचे दर्शन घेतले, मंत्री भरतशेठ गोगावले यांचा पार्वतीपूर दौरा
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्रीराम वरदानी मातेचे दर्शन घेतले, मंत्री भरतशेठ गोगावले यांचा पार्वतीपूर दौरा
राजेश सोंडकर,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महाबळेश्वर तालुक्यातील पार्वतीपूर गावमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाड-पोलादपूर चे आमदार तसेच राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज श्रीराम वरदानी मातेचे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी मंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने फुलांच्या हारांनी, आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करून उत्स्फूर्त सत्कार केला.
या वेळी डाॅ. सुभाष सोंडकर, डाॅ. प्रकाश सोंडकर, गणेश सोंडकर, देवस्थान विश्वस्त शंकर ढेबे, नितीन सोंडकर, शिवाजी राजापुरे गुरुजी, पत्रकार प्रकाश कदम, सुभाष सोंडकर,दीपक सोंडकर आणि गावातील मोठ्या संख्येने महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक भिकू सोंडकर उपस्थित होते
ग्रामस्थांशी संवाद आणि मागण्या
दर्शनानंतर मंत्री गोगावले यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील विविध अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी आश्वासन दिले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील राहतील.
ग्रामस्थांनी या प्रसंगी काही महत्वाच्या मागण्याही मांडल्या:
- महाबळेश्वर कूङपण रस्ता लवकर पूर्ण करणे
- शिवकालीन किनैश्वर ते पारघाट रस्ता शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे
- मंदिराच्या संरक्षक भिंतींचे काम मार्गी लावणे
मंत्री गोगावले यांनी ग्रामस्थांच्या या अपेक्षांकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आणि विकासासाठी सहकार्य करण्याची हमी दिली.
मंत्री गोगावले यांच्या भेटीमुळे गावात उत्सही वातावरण निर्माण झाले.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पार्वतीपूर पार गावात भरतशेठ गोगावले यांचा दौरा यशस्वी ठरला. श्रीराम वरदानी मातेचे दर्शन व ग्रामस्थांशी संवादातून विकासाच्या अपेक्षा पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत. गावकऱ्यांनी मंत्री गोगावले यांचे आभार मानत पुढील काळात गावाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा सहकार्यभाव कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Comments
Post a Comment