सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक कुंभरोशी शाखेचे कॅशियर वसंत शिर्के यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक कुंभरोशी शाखेचे कॅशियर वसंत शिर्के यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

कुंभरोशी (ता. महाबळेश्वर) :
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुंभरोशी शाखेचे कॅशियर वसंत शिर्के यांनी ३५ वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण केल्यानंतर सेवापुर्ती गाठली. त्यांच्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्रामीण भागातील विविध शाखांमध्ये कार्य करून ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य दिले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि कार्यतत्परतेचे कौतुक करत स्थानिक ग्रामस्थांनी आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात शाखाधिकारी श्री. डोईफोडे, डॉ. भिलारे, निलेश रांजणे, कृष्णा चिकणे, बाळू झाडे तसेच प्रतापगड पंचक्रोशी सोसायटीचे सचिव राहुल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना शिर्के यांनी ग्रामीण भागातील बँकिंग सेवेत केलेले योगदान अनमोल असल्याचे गौरवोद्गार काढले.

या प्रसंगी शिर्के यांनी आपल्या सेवाकालातील आठवणींना उजाळा देत सहकाऱ्यांचे व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या सेवापुर्ती निमित्त झालेल्या या सत्कार समारंभामुळे परिसरात एक वेगळे आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl