वाचन संस्कृती संवर्धनासाठी ऑनलाईन व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प आज


वाचन संस्कृती संवर्धनासाठी ऑनलाईन व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प आज

 जितेंद्र कारंडे,

प्रतापगड प्रतिनिधी :


पंचायत समिती महाबळेश्वर व प्राथमिक शिक्षक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘वाचन संस्कृती संवर्धनाय – शारदीय ऑनलाईन व्याख्यानमाले’ मधील द्वितीय पुष्प रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाईन माध्यमातून पार पडणार आहे.

या व्याख्यानासाठी प्रा. डॉ. संजय कदम (साहित्य समीक्षक व समाजभान अभ्यासक) यांना निमंत्रित करण्यात आले असून ते “ग्रंथ संस्कार आणि आजचे समाजभान” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रम सायंकाळी ७.०० ते ८.३० या वेळेत Google Meet द्वारे होणार असून, सर्व इच्छुकांनी दिलेल्या लिंक किंवा कोडचा वापर करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

🔗 Google Meet लिंक: https://meet.google.com/dfv-qooz-ddm
🆔 कोड: dfv-qooz-ddm

या व्याख्यानातून वाचन संस्कारांमुळे समाजात निर्माण होणारी जाणीव, वैचारिक बांधणी आणि आजच्या पिढीसमोरील आव्हानांची चिकित्सा होणार आहे. विशेषत: शिक्षक, विद्यार्थी, तसेच वाचन संस्कृतीबद्दल जिव्हाळा असलेल्या प्रत्येकाने या उपक्रमाचा लाभ घ्यावा, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl