श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे श्रीरामवरदायिनी मातेचा नवरात्रोत्सव सोहळा

श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे श्रीरामवरदायिनी मातेचा नवरात्रोत्सव  सोहळा
 प्रतापगड प्रतिनिधी (राजेश सोंडकर) : 
श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथे यंदाचा श्रीरामवरदायिनी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा, सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या या उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी, गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. यासोबतच देवीचा प्रकट दिन सोहळा देखील .

उत्सवाचा प्रारंभ  सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता आईचा अभिषेक केला जाईल. सकाळी ९.०० वाजता आईच्या मूळ स्थानावर 'श्री दुर्गासप्तशती' आणि 'दुर्गामाता मंगल्यस्तोत्र' यांचे पारायण होईल. सायंकाळी 'सुमधुर संगीतमय कीर्तन' आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी 'श्रीरामवरदायिनी माता उत्सव समिती'तर्फे नंदन उत्सव, दीप प्रज्वलन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या प्रकट दिनानिमित्त, कृतयुगातील महिषासुरमर्दिनी, त्रेतायुगातील श्रीरामवरदायिनी, द्वापरयुगातील दुर्गामाता आणि कलियुगातील 'मूल आदिशक्ती पद्मिनी देवी त्रिनेत्रा भवानी' यांचा गौरव करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवातील मुख्य कार्यक्रम
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दररोज सकाळी श्रींची आरती आणि सायंकाळी आरती होईल. यासोबतच महाप्रसाद, भजन, कीर्तन आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अष्टमी: मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता सर्व देवदेवतांचा अभिषेक, दुपारी १२.०० वाजता श्रींची आरती व गोंधळाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर १२.३० वाजता महाप्रसाद आणि दुपारी ३.०० वाजता हळदी-कुंकू समारंभ होईल. रात्री ७.३० वाजता आरती आणि त्यानंतर ८.०० वाजता संगीतमय भजन होईल.
नवमी: बुधवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता सखलाय श्रींची आरती, होमपूजन आणि पूर्णाहुती होईल. दुपारी १२.०० वाजता महाप्रसाद, त्यानंतर रात्री ७.३० वाजता आरती आणि ८.०० वाजता भजन होईल.
दसरा: गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होईल. सकाळी ११.०० वाजता श्रींची आरती, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद होईल. सायंकाळी ७.०० वाजता श्रींची आरती झाल्यानंतर ७.३० वाजता सिंहवड शमीपूजन व सीमोलंगन कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ८.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, देवस्थान मंदिराची सीमेवल, ग्रामप्रदर्शन, रथोत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

ट्रस्टने सर्व भाविकांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नवरात्रोत्सवातील विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी देणगी स्वरूपात सहभाग नोंदवून ट्रस्टला आर्थिक पाठबळ देण्याची नम्र विनंती करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट, मु. परसोंड किंवा श्री. कैलास तांबे (मो. ९४०३७३३००१) यांच्याशी संपर्क साधता येईल.
हे सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामपंचायत यांनी विशेष परिश्रम घेत आहेत. सर्व भाविक भक्तांनी या उत्सवात सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl