महिला व मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत – अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर पाचगणीत पोलिस ठाण्याच्या वतीने स्वसंरक्षण कार्यशाळा

महिला व मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत – अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर
पाचगणीत पोलिस ठाण्याच्या वतीने स्वसंरक्षण कार्यशाळा

छायाचित्र: विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवताना शैला कुलकर्णी

रविकांत बेलोशे 

पाचगणी  प्रतिनिधी –

 अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थिनी तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे महिला व मुलींनी आत्मनिर्भर होत स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत, असे आवाहन साताऱ्याच्या अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी केले.

सेंट पीटर्स स्कूलच्या सभागृहात पाचगणी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित “महिला सुरक्षा व उपाययोजना” या मार्गदर्शनपर कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. कडूकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भारतातील पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर व प्रसिद्ध अभिनेत्री शैला कुलकर्णी उपस्थित होत्या. पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यावेळी विशेष उपस्थित होते.

डॉ. कडूकर म्हणाल्या, “आजच्या काळात महिलांनी असुरक्षिततेवर मात करण्यासाठी आत्मसंरक्षणाची कला आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. अनपेक्षित संकटांचा सामना करताना हुशारी आणि ताकदीने प्रतिसाद दिल्यास महिला स्वतःच्याच बळावर अनेक प्रसंग टाळू शकतात. यासाठी कराटे किंवा इतर मार्शल आर्टसारखे खेळ शिकून आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमात शैला टिके-कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना समाजात वावरताना बिनधास्त राहण्याचे आणि भीती न बाळगता आक्रमकतेने संकटांना सामोरे जाण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रसंगांमध्ये स्वसंरक्षण कसे करता येते, याचे प्रात्यक्षिक सादर केले. “गुड टच-बॅड टच” यासह महिला सुरक्षेसंबंधी महत्त्वाचे मुद्दे त्यांनी विद्यार्थिनींना सोप्या भाषेत समजावून सांगितले.

या कार्यशाळेला पाचगणी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पूर्णपणे भरलेल्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांवरील अत्याचार, महिलांवरील हल्ले, तसेच असुरक्षिततेची भावना याबाबत चर्चा झाली.

कार्यक्रमात सहभागी सर्व शाळांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर स्वागत व आभार प्रदर्शन सपोनी दिलीप पवार यांनी मानले.

मार्गदर्शन करताना डॉ. वैशाली कडूकर –  रविकांत बेलोशे,छायाचित्र सेवा


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl