पोलादपूर तालुक्यात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिर

पोलादपूर तालुक्यात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिर

प्रकाश कदम
पोलादपूर प्रतिनिधी :

कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था, कोतवाल यांच्या विद्यमाने “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थापक मा. आमदार प्रविणभाऊ दरेकर (विधान परिषद गटनेते) तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेश सकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात महिलांच्या आरोग्यासाठी विविध तपासण्या करण्यात आल्या.

या आरोग्य शिबिरामध्ये हायपरटेन्शन, डायबिटीस, कॅन्सर, टीबी चाचण्या, गरोदर मातांची तपासणी, रक्त तपासणी तसेच ईसीजी यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात एकूण 70 महिलांनी आरोग्य तपासण्या करून घेतल्या.

सदर शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, पळचिल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल काकड यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य अधिकारी पोलादपूर श्रीमती गीतांजली लकोळे (कुष्ठरोग तंत्रज्ञ) यांनी कुष्ठरोग व त्यावरील समज-गैरसमज यावर माहिती दिली. तर प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी श्रीमती जाधव मॅडम यांनी किशोरवयीन मुलींच्या पौगंडावस्थेतील बदल, एड्सबाबत समज-गैरसमज तसेच मानसिक आरोग्याविषयी संवेदीकरण केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. आर.बी. जाधव सर, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पळचित RH स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच स्थानिक पातळीवर उपसरपंच श्री. राजेश कदम, संस्थेचे मार्गदर्शक श्री. गिरीधर आप्पा दरेकर, श्री. संजय मामा पार्टे, श्री. शरदराव दरेकर, गजानन पार्टे, श्री. मारुती दरेकर, श्री. केरू पवार, श्री. प्रकाश दादा दरेकर, गणेश जाधव, श्री. हनुमंत कदम, श्री. जगन्नाथ दरेकर, श्री. संतोष सकपाळ, श्री. श्रीराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. सर्वांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl