सामाजिक बांधिलकीचा अनोखा प्रत्यय : वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट

महाबळेश्वर प्रतिनिधी (विलास काळे) :

साक्षरता दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत महाबळेश्वरातील तरुण उद्योजक श्री. दुर्वेश चंद्रकांत प्रभाळे यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत एक अनोखा उपक्रम राबविला. शिक्षण आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी त्यांनी गिरिस्थान नगरपरिषद शाळा क्रमांक १, २ आणि ५ या शाळांना वाचनकट्टा उपक्रमाअंतर्गत वर्षभर वापरता येतील अशा मौल्यवान पुस्तक संचांची भेट दिली.

प्राथमिक शिक्षक वाचनालय, महाबळेश्वरच्या वतीने तालुक्यातील सर्व शाळांमध्ये दररोजच्या परिपाठात वाचन उपक्रम राबविला जातो. मात्र, महाबळेश्वरसारख्या डोंगराळ व दुर्गम भागात सर्व आवश्यक पुस्तके उपलब्ध करणे कठीण ठरत असल्याचे लक्षात घेऊन स्वतः वाचनाची आवड असलेले व समाजाशी नाळ जपणारे श्री. दुर्वेश प्रभाळे यांनी हा उपक्रम राबविला. त्यांच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध होऊन त्यांच्यात ज्ञानवृद्धीबरोबरच वाचनाची आवड वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

या विशेष कार्यक्रमाला गिरिस्थान प्रशालेचे उपशिक्षक अभिषेक साळुंखे, महाबळेश्वर प्रेमी ग्रुपचे हर्ष साळुंखे व साहिल सुतार उपस्थित होते. शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक श्री. कदम सर, शाळा क्र. २ च्या मुख्याध्यापिका सौ. काळे मॅडम आणि शाळा क्र. ५ चे श्री. कुरुंदे सर यांनी पुस्तक संच स्विकारून विद्यार्थ्यांना मिळालेल्या या मौल्यवान साधनाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक वाचनालयाचे सचिव श्री. संतोष शिंदे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. गोळे सर यांनी मानले.

वाढदिवस केवळ आनंदोत्सव न ठरता तो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानदानाचा सोहळा ठरावा, हा संदेश श्री. दुर्वेश प्रभाळे यांच्या या उपक्रमातून अधोरेखित झाला. स्थानिक समाजात त्यांच्या या पावलाचे कौतुक होत असून, यापुढेही असे उपक्रम राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl