एलफिस्टन पॉईंट व ऑर्थर सीट पॉईंटवर स्थानिक स्टॉल्स पुन्हा सुरु; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण
एलफिस्टन पॉईंट व ऑर्थर सीट पॉईंटवर स्थानिक स्टॉल्स पुन्हा सुरु; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण
महाबळेश्वर प्रतिनिधी (जितेंद्र कारंडे ):
महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून येथे येणाऱ्या पर्यटकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ लहान-मोठे व्यवसाय चालवतात. मात्र, काही काळापूर्वी वनविभागाने ऑर्थर सीट व लाडविक पॉईंटसारख्या ठिकाणी व्यवसाय करण्यावर बंदी घालल्याने जवळपास 60 कुटुंबांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे जननायक आमदार आणि मदत पुनर्वसन मंत्री श्री मकरंद आबा पाटील यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. आमदार पाटील यांनी वनविभागाशी संपर्क साधून स्थानिक ग्रामस्थांसाठी व्यवसाय सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला.
या प्रयत्नांमुळे स्थानिक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. ग्रामस्थांच्या मते, या यशामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनीही नागरिकांना आणि ग्रामस्थांना सहकार्य केले, हे महत्त्वाचे ठरले आहे.
स्थानिकांनी म्हटले की, कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न मार्गी लागल्याने आर्थिक विवंचनेतून सुटका मिळेल. तसेच महाबळेश्वरच्या पर्यटन क्षेत्राला देखील चालना मिळेल. पुढील काळात या प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटनासोबत स्थानिक व्यवसायाच्या संधी कायम राहिल्याने रोजगार, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक विकास या सर्वांमध्ये वाढ होईल.
Comments
Post a Comment