महाबळेश्वर - तळदेव रस्त्यालगत मौजे कोट्रोशी हददीतील विज्ञानगड प्रकल्पा विरोधात हरीत लवाद कडे तक्रार
सखोल तपासनी शिवाय प्रकल्प सुरु करु नये अन्यथा आंदोलनाचा इशारा :- श्री.उत्तम भालेराव
राजेश सोंडकर/जितेंद्र कारंडे
महाबळेश्वर प्रतिनिधी : -
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मौजे कोट्रोशी येथील सर्वे क्रमांक ६ ३ / १ मध्ये एका खासगी कंपनीने उभारलेल्या भव्य अम्युझमेंट आणि विज्ञान प्रकल्पावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत श्री.उत्तम यदुनाथ भालेराव यांनी राष्ट्रीय हरित लवाद कडे लेखी तक्रार अर्ज दाखल करून विज्ञान केंद्र प्रकल्प उल्लंघन करून उभा केला असल्याची दाट शक्यता असल्याने शासकीय व हरीत लवादकडे या प्रकल्पा विरोधात तक्रार अर्ज केला आहे या प्रकल्पाची जो पर्यत प्रत्यक्ष सखोल चौकशी तपास करून कार्यवाही पूर्न होत नाही तो पर्यंत प्रकल्प सुरु करण्यास परवानगी देन्यात येवू नये अशी मागणी श्री.उत्तम भालेराव यांनी केली आहे
तक्रारदार श्री उत्तम भालेराव यांनी हरीत लवाद न्यायालयाकडे केलेल्या तक्रारीत काही प्रमुख ठळक मुद्दे उपस्थीत केले आहेत.
मौजे कोट्रोशी, ता. महाबळेश्वर येथील स.नं.६ ३ / १ या १५ ते २० एकर जागेवर गेली २०-२२ वर्षांपासून अम्युझमेंट मशिनरी केबल कार , दुर्बीण , एक्झिबिशन प्रोजेक्ट , तारांगण' अशा स्वरूपाचा प्रकल्प उभा करण्यात आला आहे या प्रकल्पासाठी त्याच मिळकती मधील डोंगराच्या उंच ठिकाणावर प्रशस्त भले मोठे उंच सहा ते सात मजली इमारतीचे भले मोठे बांधकाम केले असून लगतच्या जमीन क्षेत्रात मोठा पाण्याचा तलाव तयार करण्यात आला आहे. तसेच मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या बाजूलाही तीन ते चार इमारतींची बांधकामे केली आहेत.
वरील बाजुस उंच डोंगरावर प्रकल्पाच्या ठिकानावर खालून वर ये - जा करण्यासाठी रेल्वेच्या रुळासारखा लोहमार्ग तयार करण्यात आला असून त्यावर डबे बसवून माणसांची व साहित्याची वाहतूक सुरू असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
मौजे कोट्रोशी हददीत उभारनेत आलेल्या या भव्य दिव्य विज्ञानगड मनोरंजन प्रकल्पा संबंधीत कागदपत्रे , लेखी माहिती शासकीय नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग , सातारा यांच्याकडे माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत मागितली असता सातारा नगर रचना कार्यालयाने ती पुरवण्यास सातत्याने टाळाटाळ करून असमर्थता ज्या अर्थी दर्शवल्याने तसेच या प्रकल्पाची कागदपत्र मागणी करनार्या अर्जदाराला लेखी पत्राव्दारे ज्या अर्था साधे उत्तरही दिले नाही त्या आर्थि कागदोपत्री मंजूर असलेल्या कागदपत्रांमध्ये व प्रत्यक्ष केलेल्या प्रकल्पाच्या कामामधे तफावत असन्याची दाट शंका / संशय निर्माण होत असल्याचे श्री . उत्तम भालेराव यांचे म्हटले आहे .
मौजे कोट्रोशी येथील स .नं . ६ ३ / १ मधील मंजूर विज्ञान केंद्र प्रकल्पाचे बाधकाम आराखडे परवानगी आदेश आणि विविध शासकीय विभागांचे ना- हरकत प्रमाणपत्र आदेशा प्रमाणे प्रत्यक्ष जागेवरील प्रकल्पाचे काम केले गेले आहे अथवा नाही प्रत्यक्ष काही तफावत तर नाहीये ना याची वरिष्ठ शासकीय पातळीवर सखोल चौकशी तपास करण्याची मागणी श्री.उत्तम भालेराव यांनी केली आहे .
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे कोट्रोशी हददीत महाबळेश्वर तळदेव - रस्त्यालगत उभारलेल्या या प्रकल्प कागदोपत्री नियमानुसार उभारला गेला आहे किवा या सखोल तपासनी करन्यासाठी तसेच प्रकल्पाच्या जागेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा अहवाल तयार करण्यासाठी शासकीय विविध विभागातील अधिकाऱ्यांची समिती तयार करून प्रकल्पाची स्थळ पाहणी अहवाल तयार करून कार्यवाही ची मागणी करून अंतीम निष्कर्ष अहवाल येई तो पर्यंत प्रकल्प सुरु करण्यास मान्यता देन्यात येवू नये अशी देखील निवेदनात मागणी केली आहे
जर अंतीम तपासणी अहवाल आले शिवाय कोट्रोशी हददीतील महाबळेश्वर - तळदेव रस्त्यालगतचा विज्ञानगड प्रकल्प सुरू केला असेल तर तो कायदेशीर कारवाई करून तात्काळ स्थगित करण्यात यावा.
शासकीय वरीष्ट स्तरावर हरीत लवाद कडे वरीष्ट स्तरावर दाखल केलेल्या तक्रार अर्जातील मुद्द्यांची दखल घेऊन तात्काळ कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही श्री उत्तम भालेराव यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment