पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या हिलदारी अभियानांतर्गत स्वच्छोत्सवाची सुरुवात

पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या हिलदारी अभियानांतर्गत स्वच्छोत्सवाची सुरुवात

 महाबळेश्वर प्रतिनिधी (विलास काळे)–
केंद्र शासनाच्या “स्वच्छता ही सेवा” उपक्रमाच्या अनुषंगाने व हिलदारी अभियानांतर्गत पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचा समावेश असलेला “स्वच्छोत्सव” सुरू करण्यात आला आहे.

सफाई मित्रांसाठी आरोग्य उपक्रम

या उपक्रमाचा प्रारंभ शहरातील सफाई मित्रांसाठी आयोजित ओरल हायजीन कॅम्प पासून झाला. या शिबिरात सर्व सफाई मित्रांची दंत तपासणी, ओरल क्लिनिंग तसेच गरजेनुसार मोफत उपचाराची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होणार असल्याचे हिलदारीचे प्रशासकीय व्यवस्थापक मुकेश कुलकर्णी यांनी सांगितले.

पर्यटकांमध्ये जनजागृती

स्वच्छता जनजागृतीचा संदेश पर्यटकांपर्यंत पोहोचावा यासाठी दांडेघर टोल नाक्यावर विस्डम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह हिलदारी टीमने विशेष मोहीम राबवली. आकर्षक फलकांच्या माध्यमातून स्वच्छ पाचगणीचा संदेश देण्यात आला. या मोहिमेला पर्यटकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यानंतर टोल नाका ते सिडनी पॉईंट दरम्यान “प्लकेथॉन” आयोजित करण्यात आला. या उपक्रमात तब्बल ६७ किलो सुका कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत एकूण ७२ स्वयंसेवकांचा सहभाग होता.

कॉलेज विद्यार्थ्यांचा सहभाग

खिंगर रोड परिसरात मीनल बेहेन मेहता कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककाशी संलग्नित मेगा क्लीन-अप ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले. यामध्येही विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

इतर महत्त्वाचे उपक्रम

स्वच्छोत्सवाच्या कालावधीत खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत –

  • हॉटेल स्टाफसाठी स्वच्छता व आरोग्यविषयक प्रशिक्षण
  • सफाई मित्रांसाठी प्रॉडक्ट मेकिंग ट्रेनिंग
  • इको-फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ
  • विविध उपक्रमात सहभागी झालेल्यांचा सन्मान सोहळा
  • सफाई मित्रांच्या शासकीय योजनांमध्ये नोंदणीसाठी विशेष कॅम्प

उपक्रमाचा समारोप

अभियानाच्या अंतिम दिवशी, केंद्र शासनाच्या “नमस्ते योजना” अंतर्गत सफाई मित्रांची डिजिटल प्रोफाईल तयार करून त्याचे विमोचन करण्यात येणार आहे. तसेच त्यांना शासकीय योजनेअंतर्गत कार्ड्सचे वितरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सहकार्य व मार्गदर्शन

या उपक्रमासाठी मुख्याधिकारी व प्रशासक पंडित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून, आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, सहाय्यक आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे, सुरेश मडके, शहर समन्वयक ओंकार ढोले, विस्डम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे व्यवस्थापन समिती व प्राचार्य यांचे विशेष सहकार्य लाभले.

हिलदारीचे दीपक मदने, गणेश कासुर्डे, दिपाली धनावडे, प्राजक्ता बोडरे, अस्मिता कासुर्डे, शुभम भंडारी आदी कार्यकर्ते उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातत्याने परिश्रम घेत आहेत.

हा स्वच्छोत्सव उपक्रम केवळ शहराची स्वच्छता वाढविण्यासाठीच नाही तर स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी हा संदेश देऊन स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि सफाई मित्र यांना एका समान ध्येयासाठी एकत्र आणतो आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl